जळगाव शहरात 87 प्रजातींच्या 5 हजार 31 पक्ष्यांची नोंद
By admin | Published: April 19, 2017 03:25 PM2017-04-19T15:25:40+5:302017-04-19T15:25:40+5:30
ग्रीड पाडून ट्रांङिाट लाईन पध्दतीने आठ भागात पक्ष्यांची गणना
Next
जळगाव,दि.19 - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस.) च्या बर्ड मॉनेटीरींग प्रोग्रॅम च्या वतीने 9 ते 16 एप्रिल दरम्यान सकाळी 7 ते 9 या दोन तासात जळगाव शहरासह विविध आठ भागांमध्ये सामान्य पक्षी गणना सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात आला. या गणनेत 87 प्रजातींच्या 5 हजार 31 पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती कॉमन बर्ड मॉनेटरींग प्रोग्रॅम चे जिल्हा समन्वयक राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.
या भागांमध्ये केले सर्वेक्षण
या आठ दिवसात पक्षी गणना शहरातील विविध आठ भागात करण्यात आली. यामध्ये सावखेडा,मन्यारखेडा,मेहरूण तलाव, हनुमान खोरे, निमखेडी, कानळदा रोड, ममुराबाद रोड, डॉ.शामाप्रसाद उद्यान ते शिवाजीनगर दाळफड या परिसरात ग्रीड पाडून ट्रांङिाट लाईन पध्दतीने पक्षी गणना करण्यात आली. या निवडलेल्या आठ भागांवर गुगल अर्थ च्या माध्यमातून दोन बाय दोन किलोमीटर च्या ग्रीड पाडून त्यावर ट्रांङिाट लाईन टाकण्यात आल्याची माहितीही गाडगीळ यांनी दिली.