५ हजारांची लाच भोवली, तलाठी अन् कोतवालास अटक; अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 03:52 PM2023-03-23T15:52:57+5:302023-03-23T15:53:13+5:30

चाळीसगाव : बोरखेडा ग्रामपंचायत कार्यालयात धडक कारवाई

5 thousand bribe, Talathi and Kotwala arrested; The authorities caught him red-handed | ५ हजारांची लाच भोवली, तलाठी अन् कोतवालास अटक; अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

५ हजारांची लाच भोवली, तलाठी अन् कोतवालास अटक; अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

googlenewsNext

संजय सोनार

चाळीसगाव, जि. जळगाव : शेतजमीन नावावर करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना बोरखेडा, ता. चाळीसगाव येथील तलाठी आणि कोतवाल यांना रंगेहाथ पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी बोरखेडा ग्रामपंचायत कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.
तलाठी ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (५० रा. शिवशक्तीनगर, चाळीसगाव) आणि कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (३७, रा. श्रीकृष्णनगर, चाळीसगाव) अशी लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या नावे बोरखेडा बु. येथील शेतजमीन आहे. त्यांच्या हिश्श्यावरील एक गट पत्नीच्या नावे करून द्यावा, यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यासाठी तलाठ्याने नोव्हेंबर-२०२१ मध्ये सात हजार रुपयांची रक्कम घेतली होती. तरीही काम न झाल्यामुळे तक्रारदार हे तलाठ्यास भेटले. यावेळीही तलाठ्याने प्रथम सात हजार रुपये व तडजोडीअंती पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. पाच हजाराची रक्कम घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 5 thousand bribe, Talathi and Kotwala arrested; The authorities caught him red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.