सोमवारी मध्यरात्रीपासून ५ हजारावर एस़ टी क़र्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 03:17 PM2017-10-15T15:17:22+5:302017-10-15T15:25:01+5:30

कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत नेहमीच शासनाकडून आश्वासनांचा पाऊस पडतो़ मात्र मागण्या पूर्ण होत नाही़ या मागण्या मान्य होईपर्यंत एस़. टी. क़ामगारांनी बेदमुत संपाचे हत्यार उपसले आहे़

5 thousand ST employees' strike in the evening from Monday midnight | सोमवारी मध्यरात्रीपासून ५ हजारावर एस़ टी क़र्मचारी बेमुदत संपावर

सोमवारी मध्यरात्रीपासून ५ हजारावर एस़ टी क़र्मचारी बेमुदत संपावर

Next
ठळक मुद्देऐन दिवाळीत प्रवाशांचे चांगलेच हाल होणारसोमवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवातएकही एसटी आगारातून बाहेर पडणार नाही़

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१५-कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत नेहमीच शासनाकडून आश्वासनांचा पाऊस पडतो़ मात्र मागण्या पूर्ण होत नाही़ या मागण्या मान्य होईपर्यंत एस़. टी. क़ामगारांनी बेदमुत संपाचे हत्यार उपसले आहे़ सोमवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील एकाही आगारातून एस़टी़बाहेर निघणार नाही, अशी माहिती रविवारी पत्रकार परिषदेत कामगार संघटनांच्या पदाधिकाºयांनी दिली़

ऐन दिवाळीतील या आंदोलनामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहे़
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला एस़टीक़ामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चांगरे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, विभागीय सचिव योगराज पाटील, डेपो अध्यक्ष सोपान सपकाळे,  इंटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंह राजपूत, जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीधर चौधरी, एस़टी़पतपेढीचे संचालक मनोज सोनवणे, जगपालसिंग गिल, दिनेश महाशब्दे,  प्रसिध्द प्रमुख संदीप सुर्यवंशी, कामगार संघटनेचे प्रसिध्द प्रमुख विनोद शितोळे आदी उपस्थित होते़


सोमवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात
सोमवारी मध्यरात्री जळगाव आगारासह जिल्हाभरातील आगार, एसटीवर्कशॉप येथे मंडप टाकण्यात येणार असून आंदोलनाला सुरुवात होणार आहे़ वाहन, चालक तसेच यांत्रिक विभागातीलअसे एकूण जिल्हाभरातील ५६०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत़ दोन महिन्यांपासून आंदोलनाबाबत शासनाला कायदेशाीर नोटीस देण्यात आली होती़ मात्र तरीही दखल न घेतल्याने राज्यव्यापी आंदोलनाची भुमिका घेण्यात आली आहे़ आंदोलनादरम्यान एकही एसटी आगारातून बाहेर पडणार नाही़ ऐन दिवाळीत होत असलेल्या आंदोलनामुळे संघटना पदाधिकाºयांनी प्रवाशांकडे संघटना पदाधिकाºयांनी दिलगीरी व्यक्त केली आहे़ आंदोलनाला विदर्भ कामगार संघटना, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना, संघर्ष गृप अशा विविध संघटनांनी पाठींबा दिला असल्याचेही यावेळी सुरेश चांगरे यांनी सांगितले़

अशा आहेत मागण्या
१ एप्रिल २०१६ पासून एस़टीक़र्मचाºयांना राज्यातील शासकीय कर्मचाºयांप्र्रमाणे वेतनश्रेणी, वेतन, विविध भत्ते, सेवा-सवलतीसह व सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, १ जुलै २०१६ पासून वाढीव ७ टक्के महागाई भत्ता तसेच जानेवारी २०१७ पासून वाढीव ४ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ अदा करावी, संप, बंद, आंदोलन, उपोषण इत्यादीप्रकरणी गैरहजर राहणाºया कर्मचाºयांना वेतन कपातीचे काढलेले बेकायदेशी परिपत्रक रद्द करण्यात यावे, पदनिहाय नवीन वेतनश्रेणी निश्चित करावी,  यांत्रिक कर्मचाºयांना ग्रेडेशना लाभ देण्यात यावा,  निलंबित करताना महामंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यात यावी, गणवेशाचा कापड व शिलाई भत्ता तत्काळ देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेदमुत संप करण्यात येत आहे़

Web Title: 5 thousand ST employees' strike in the evening from Monday midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.