पैसे वाटप तक्रारींचा पाऊस, विविध भागातून तब्बल ५० तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:48 PM2018-08-01T13:48:37+5:302018-08-01T13:49:08+5:30
पोलिसांची स्वतंत्र पथके
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानास प्रारंभ झाल्यापासून दुपारी सव्वा वाजेपर्यंत आचारसंहिता कक्षाकडे पैसे वाटप होत असल्याबाबत विविध भागातून तब्बल ५० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मनपा निवडणूकीसाठी प्रभागनिहाय १९ पथके व ३ भरारी पथके त्याशिवाय पोलिसांची स्वतंत्र पथके असल्याने तक्रार मिळताच काही मिनीटातच कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चौकशी करीत होते. मात्र केवळ समतानगर परिसरात हनुमान मंदिराजवळ पैसे वाटपासाठी आलेली स्कॉर्पिओ पकल्याच्या वृत्तात तथ्य आढळून आले. संबंधीत लोक वाहन लॉक करून पळून गेल्याचे आढळून आल्याने ते वाहन पोलीस स्टेशनला नेण्यात आले. तेथे पंचनामा करून ते वाहन उघडून आत किती रक्कम आहे? त्याची तपासणी करण्यात आली.