कोरोनात ५० टक्के मृत्यू मधुमेहामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:35 AM2020-12-22T00:35:12+5:302020-12-22T00:35:37+5:30

२७ वर्षीय तरुणाच्या मृत्यू

50% of deaths in corona are due to diabetes | कोरोनात ५० टक्के मृत्यू मधुमेहामुळे

कोरोनात ५० टक्के मृत्यू मधुमेहामुळे

Next

आनंद सुरवाडे
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी समितीकडून याचे परीक्षण केले जाते. यात ५३३ मृत्यूचे परीक्षण केल्यानंतर यातील २७० रुग्णांना अर्थात ५०.६६ टक्के लोकांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. रविवारी झालेल्या २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यू यकृत निकामी  झाला असे कारण डॉक्टरांनी नोंदविले आहे. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आकडेवारीनुसार ३५४ पुरुष व १७९ महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृतांमधील ४०४ रुग्णांना विविध व्याधी होत्या, तर १२९ रुग्णांना कसल्याही व्याधी नव्हत्या. मात्र, वय अधिक असणे आणि वेळेवर रुग्णालयात न येणे अशी त्या मागे काही कारणे नोंदविली आहेत. 
तरुणाचा मृत्यू, तज्ज्ञांना काय वाटते?
जळगाव शहरातील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या तरुणाचे यकृत निकामी झाले होते. मुळात तो कोरोना म्हणून नव्हे, तर हेपेटायटीसमुळे रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला दम लागत होता, अन्य लक्षणे नव्हती, त्याची आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.  यकृतात प्रोटिन्स तयार होतात, यामुळे प्रतिकारक्षमता वाढते, मात्र, हे प्रोटिन्स तयार न झाल्याने प्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय यकृत खराब झाल्याने विषारी पदार्थ मेंदूत जातात व त्याच्यामुळे रुग्णाला दम लागतो, अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख तसेच डेथ ऑडिट कमिटीचे अध्यक्ष डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली. 

Web Title: 50% of deaths in corona are due to diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव