५०% निधी खर्च करणाऱ्यांना ‘गिफ्ट’; १९४ आमदारांना एक कोटीचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 08:44 AM2023-03-26T08:44:16+5:302023-03-26T08:44:27+5:30

तत्पूर्वी प्रत्येकी चार कोटींचा निधी यापूर्वीच वाटप झाला आहे.

50% of fund spenders are 'gifted'; 1 crore fund to 194 MLAs | ५०% निधी खर्च करणाऱ्यांना ‘गिफ्ट’; १९४ आमदारांना एक कोटीचा निधी

५०% निधी खर्च करणाऱ्यांना ‘गिफ्ट’; १९४ आमदारांना एक कोटीचा निधी

googlenewsNext

जळगाव : प्राप्त निधीपैकी ५० टक्के खर्च झालेल्या व प्रशासकीय मान्यता ८० टक्के असलेल्या मतदारसंघांनाच एक कोटीचा वाढीव निधी वितरित होईल. या निकषाच्या आधारावर राज्यातील १९४ विधानसभा सदस्य पात्र ठरले असून, त्यांना एक कोटीचा निधी पावला आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून विधानमंडळ सदस्यांना ५ कोटींचा निधी दिला जाणार होता.

तत्पूर्वी प्रत्येकी चार कोटींचा निधी यापूर्वीच वाटप झाला आहे. वाढीव एक कोटीचा निधी वाटप करण्यासाठी वित्त विभागाने निकषात बसणाऱ्या आमदारांचा अहवाल मागविला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी राज्यातील १९४ आमदारांना प्रत्येकी १ कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे.

पात्र आमदारांची संख्या (कंसात) : 
मुंबई शहर (१०), मुंबई उपनगर (२६), ठाणे (१८), पालघर (६), रायगड (२), रत्नागिरी (२), सिंधुदुर्ग (२), नाशिक (१४), धुळे (२), नंदुरबार (२), जळगाव (११), अहमदनगर (९), पुणे (२), सातारा (८), सांगली (८), सोलापूर (११), कोल्हापूर (५), छत्रपती संभाजीनगर (८), जालना (३), बीड (१), परभणी (३), हिंगोली (४), धाराशिव (४), लातूर (१), बुलढाणा (२), अकोला (२), वाशिम (०), अमरावती (५), यवतमाळ (१), नागपूर (७), वर्धा (४), भंडारा (२), गोंदिया (२), चंद्रपूर (३), गडचिरोली (१).

Web Title: 50% of fund spenders are 'gifted'; 1 crore fund to 194 MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.