बसभाड्यात मिळतेय ५० टक्के सूट... महिलांनी बांधली आरक्षणाची वज्रमूठ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:07 PM2023-04-27T16:07:25+5:302023-04-27T16:07:42+5:30

आरक्षित आसनांवर ८० टक्के प्रमाण, ‘स्लीपर’ व ‘शिवशाही’ला पसंती

50 percent discount on bus fare | बसभाड्यात मिळतेय ५० टक्के सूट... महिलांनी बांधली आरक्षणाची वज्रमूठ!

बसभाड्यात मिळतेय ५० टक्के सूट... महिलांनी बांधली आरक्षणाची वज्रमूठ!

googlenewsNext

कुंदन पाटील, जळगाव: एस.टी. महामंडळाने पुणे, मुंबईच्या प्रवासासाठी ‘स्लीपर’ बससेवा सुरु केल्याने अनेकांचा स्वस्तात प्रवास सुरु आहे. खासगी लक्झरी बसच्या तुलनेत निम्मेच भाडे असल्याने अनेकांनी या बससेवेला पसंती दिली आहे.त्यातच ‘स्लीपर’सह शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण करणाऱ्यांमध्ये ८० टक्के महिला असल्याचे दिसून आले आहे. निम्मे भाड्यातच प्रवास होत असल्याने विविध घटकातील लाभार्थ्यांना पुणे-मुंबईच्या प्रवासासाठी दोन्ही बसगाड्यांना पसंती दिली आहे.

जळगाव आगाराकडून मुंबई आणि पुण्यासाठी स्लीपर बससेवा सुरु आहे. सुरुवातीला या सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. कालांतराने खासगी बससेवेच्या तुलनेन स्लीपत बसचे भाडे कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या बससेवेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आरामदायी बस

स्लीपर बसमध्ये बैठकी आसन व्यवस्थाही उपलब्ध आहे. त्यानंतर झोपण्यासाठी असलेले आसनही प्रशस्त आहे. ‘स्लीपर’ बस वातानुकुलित नाही. मात्र उघडणारी खिडकीची सोय करण्यात आली आहे. खाली बैठक व वरच्या बाजुला झोपण्यासाठी आसनाची व्यवस्था केली असल्याने प्रवाशांना निवांतपणे प्रवास करता येत आहे.

महिलांची प्रचंड गर्दी

महिलांना बसभाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.त्यामुळे स्लीपर व शिवशाही बसमध्ये सर्वाधिक महिला प्रवाशांकडून प्रवास केला जात आहे. तसेच दिवसेंदिवस होणारी गर्दी लक्षात घेता बहुसंख्य महिला आरक्षणाला प्राधान्य देत आहेत.

यांनाही सवलत

  • वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेले, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांगांना स्लीपर बसमध्ये सवलत लागू आहे.
  • फक्त अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना या बसमध्ये सवलत लागू नाही. 
  • शिवशाहीमध्ये मात्र लागू आहे.
  • जळगावहून स्लीपर बसचे भाडे
  • शहर- पूर्ण भाडे- निम्मे भाडे
  • मुंबई-८७०-४४०
  • नाशिक-५१५-२६०
  • औरंगाबाद-३४०-१७०
  • पुणे-८२५-४१५


दहापैकी २ बसेस सेवेत नव्याने दाखल झालेल्या नव्या १० साध्या बसपैकी मंगळवारी जळगाव आगाराला दोन बसेस मिळाल्या आहेत. या दोन्ही बसेस नाशिक मार्गावर धावायला लागल्या आहेत. अन्य ८ पैकी ५ नाशिक तर ३ छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणार आहेत.

सुखकर व निवांत प्रवास करण्यासाठी स्लीपर बससेवा लांबपल्ल्यासाठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होत आहे. -संदीप पाटील, आगार व्यवस्थापक, जळगाव.

Web Title: 50 percent discount on bus fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.