चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाला पकडण्यासाठी 50 जणांचे पथक दाखल, 25 शार्प शुटरचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:28 PM2017-11-28T12:28:29+5:302017-11-28T12:31:25+5:30

नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात सहावा बळी

50 squad for catching li0pard in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाला पकडण्यासाठी 50 जणांचे पथक दाखल, 25 शार्प शुटरचा समावेश

चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाला पकडण्यासाठी 50 जणांचे पथक दाखल, 25 शार्प शुटरचा समावेश

Next
ठळक मुद्देपथक वरखेड परिसरात तैनातबिबटय़ाच्या दहशतीचे सावट कायम

ऑनलाईन लोकमत

वरखेडे, जि. जळगाव, दि. 28 - चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात सहावा बळी गेल्यानंतर त्याला पकडण्साठी यंत्रणा सज्ज झाली असून मंगळवारी वनविभाग, महसूल विभागाचे तसेच 25 शार्पशुटर असे एकूण 50 जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वरखेडे परिसरात सकाळीच दाखल झाले आहे. 

चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाच्या दहशतीचे सावट कायम असून तीन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर तालुक्यातील एकूण सहावा बळी बिबटय़ाने मंगळवारी पहाटे  3 वाजेच्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबटय़ाच्या भीतीचा थरार कायम आहे.
वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली या 70वर्षीय महिलेवर झोपेत  बिबटय़ाने हल्ला करीत ठार केले.  मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास  ही घटना  घडली.   या हल्ल्यानंतर वनविभागाने पथक तयार केले असून ते वरखेड परिसरात तैनात झाले आहे. 

Web Title: 50 squad for catching li0pard in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.