भुसावळ शहरातील शतकोत्तर सार्वजनिक वाचनालयात 50 हजारांवर ग्रंथ संपदा

By admin | Published: April 23, 2017 05:32 PM2017-04-23T17:32:00+5:302017-04-23T17:32:00+5:30

ब्रिटिशकालीन वाचनालयाची दीड शतकाकडे यशस्वी वाटचाल सुरू आह़े

50 thousand books wealth in the centenary public library in Bhusaval City | भुसावळ शहरातील शतकोत्तर सार्वजनिक वाचनालयात 50 हजारांवर ग्रंथ संपदा

भुसावळ शहरातील शतकोत्तर सार्वजनिक वाचनालयात 50 हजारांवर ग्रंथ संपदा

Next

ऑनलाइन लोकमत / गणेश वाघ 
(पुस्तक दिन विशेष)

भुसावळ, जि. जळगाव, दि. 23 - भुसावळातील सार्वजनिक वाचनालयाला सुमारे 147 वर्षाचा इतिहास असून ब्रिटिशकालीन वाचनालयाची दीड शतकाकडे यशस्वी वाटचाल सुरू आह़े आजघडीला सुमारे 50 हजार ग्रंथ संपदा वाचनालयात आह़े भुसावळ तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय एकमेव अ वर्ग प्राप्त हे वाचनालय असून  या वाचनालयाच्या अंतर्गत 20 वाचनालये (पालकत्वाखाली) तालुक्यात आहेत़
ब्रिटिशकालीन वाचनालय
20 जुलै 1870 मध्ये या वाचनालयाची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे.  ब्रिटिशकालीन वाचनालय असून सुरुवातीला त्याचे नाव नेटिव्ह पब्लिक लायब्ररी असल्याचा उल्लेख असून स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक वाचनालय असे नामकरण करण्यात आल़े
विद्याथ्र्यासाठी विविध उपक्रम
वाचनालयातर्फे विद्याथ्र्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात़  त्यात बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात तर थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथीदिनी तसेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे आयोजन केले जात़े शिवाय छायाचित्र व ग्रंथ प्रदर्शनही भरवले जात़े
स्पर्धा परीक्षेसाठी विविध पुस्तके
 स्पर्धा परीक्षेसाठी प्रतियोगिता दर्पण, कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू व स्पर्धा परीक्षा ही पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहेत़ विशेष म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत ती उपलब्ध आहेत़ विद्याथ्र्याना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आह़े
सुसज्ज वाचनालयाची आवश्यकता
वाचनालयाला शासनाकडून साधारणत: दोन टप्प्यात प्रत्येकी एक लाख 92 हजार रुपये अनुदान दिले जात़े एकूण तीन लाख 84 हजार मिळणा:या अनुदानाच्या तुलनेत कर्मचारी पगार व अन्य बाबींवर होणारा खर्च अधिक असल्याने शासनाने वाचनालयाच्या अनुदानात वाढ करण्याची गरज आहे.
 नेटीव्ह पब्लिक लायब्ररी ते सार्वजनिक वाचनालय़़़
ब्रिटीशांनी 1870 मध्ये या वाचनालयाची स्थापना केल्याचा संदर्भ आढळतो़ सुरुवातीला या वाचनालयाचे नाव नेटीव्ह पब्लिक लायब्ररी असल्याचे संशोधन अॅड़स्व़मो़वा़केळकर व स्व़डॉ़बी़व्ही़कानीटकर यांना 20 जुलै 1890 मध्ये मिळालेल्या अहवालावरून केले होत़े
धर्मशाळेतून वाचनालय आले जुन्या न्यायालयात
1884 मध्ये हे वाचनालय मूलचंद धर्मशाळेत होते मात्र नंतर त्याचे यावल रोडवरील शासकीय जागेवर स्थलांतर झाल़े वाचनालय आज ज्या जागेवर उभे आहे तेथे ब्रिटीशकालीन न्यायालय होते व मागच्या बाजूला कैद्यांना फाशीची शिक्षा दिली जायची, असा संदर्भही आढळतो नंतर या न्यायालयाच्या जागेवर वाचनालयाची उभारणी करण्यात आली़ आजही ब्रिटीशकालीन इमारत त्याची साक्ष देत़े हल्ली वाचनालयाची जागा पालिकेच्या नावावर आह़े

Web Title: 50 thousand books wealth in the centenary public library in Bhusaval City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.