मलनिस्सारण योजनेचे ५० टक्के काम पूर्ण,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:10 AM2021-01-01T04:10:56+5:302021-01-01T04:10:56+5:30
९८ किमी टाकण्यात आली पाइपलाइन : मुदतीआधी काम पूर्ण होणार मलनिस्सारण योजना - २९० कोटी पहिल्या टप्प्यातील कामाचा खर्च ...
९८ किमी टाकण्यात आली पाइपलाइन : मुदतीआधी काम पूर्ण होणार
मलनिस्सारण योजना - २९० कोटी
पहिल्या टप्प्यातील कामाचा खर्च - १६९ कोटी
एकूण पाइपलाइन - २०४ किमी
पूर्ण झालेले काम - ९८ किमी
काय होईल फायदा - ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी शेतीसाठी वापरता येईल. तसेच गिरणा व मेहरूण तलावात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण येऊन नदी व तलावात होणारे जलप्रदूषण थांबणार आहे. यासह मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात नवीन बांधकामांना शौचालयांसाठी सेफ्टीक टँक तयार करण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेंतर्गत उच्च दाबाची मुख्य वाहिनी १५० मीटरची राहणार आहे. यासह ४८ एमएलडीचे मलनिस्सारण केंद्रदेखील तयार करण्यात येणार आहे. या योजनेतून ४० हजार प्रॉपर्टी कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात या भागात झाले काम
शिवाजीनगर या भागातून कामाला सुरुवात होऊन जुने जळगाव, मेहरूण तलाव परिसर, अक्सा नगर, आदर्श नगर, गणपती नगर, काव्यरत्नावली चौक, व्यंकटेश मंदिर, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, बसस्थानक परिसर, कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, बळीराम पेठ अशा भागांत पहिल्या टप्प्यातील काम होणार आहे.
मनपाला मिळणार उत्पन्नाचे साधन - महापालिका प्रशासनाकडून शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यामुळे मनपाला भविष्यात उत्पन्नाचा स्रोतदेखील मिळू शकतो. दीपनगर प्रकल्प प्रशासनाने मनपाकडे प्रक्रिया केलेल्या पाण्याची रक्कम निर्धारित करून ते पाणीदेखील मिळण्याबाबतचा प्रस्ताव मागितला आहे.