जळगाव शहरात लावणार 500 कडूनिंबाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 05:56 PM2017-05-27T17:56:48+5:302017-05-27T17:56:48+5:30

चला शहर हिरवेगार करूया : सात संस्था व व्यक्तींचा पुढाकार

500 lime plants to be set up in Jalgaon city | जळगाव शहरात लावणार 500 कडूनिंबाची झाडे

जळगाव शहरात लावणार 500 कडूनिंबाची झाडे

Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.27 : शहरात सात संस्था व व्यक्ती एकत्र येत 500 कडूनिंबाची झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याचा शुभारंभ 5 जून  रोजी  सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्य़ाजवळून होणार आहे. 
मराठी प्रतिष्ठानच्या पुढाकारामुळे मराठी प्रतिष्ठान, पातोंडेकर ज्वेलर्स, जय किरण प्रभाजी नागरी सहकारी संस्था, स्व. विजय जगन्नाथ वाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ  सिद्धी विनायक हॉस्पिटल,  नरेश खंडेलवाल, दिनेश  बुटवाणी व जळगाव महानगर पालिका यांच्या संयुक्तविद्यमाने प्रथमच जळगाव शहरातील 7 वृक्षप्रेमी संस्था व व्यक्ती  एकत्र आले आहे.  त्यांच्यावतीने शहरात 500 कडूनिंबाची झाडे लावणे व जगवणे असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मजबूत  ट्री गार्ड व प्रत्येक झाडाला ठिंबक प्रणालीचा वापर करून झाडाला दत्तक देण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी प्रथम जळगाव शहरामधील रिक्षा चालकांना सहभागी करून घेतले जात आहे.  
5 जूनपासून सुरू होणारा उपक्रम 31 ऑगस्ट 2017 र्पयत राबविला जाणार आहे. वृक्ष प्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवावा व अधिक माहितीसाठी विजय वाणी, प्रमोद ब:हाटे, अॅड.जमील देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.  

Web Title: 500 lime plants to be set up in Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.