जळगाव : चांदीच्या भावात ५०० रुपयांची वाढ, सोन्याच्याही भावात १०० रुपयांची वाढ
By विजय.सैतवाल | Published: April 29, 2023 04:53 PM2023-04-29T16:53:36+5:302023-04-29T16:53:43+5:30
सोन्याच्याही भावात १०० रुपयांची वाढ होऊन ते ६० हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
जळगाव : दोन दिवस घसरण झालेल्या चांदीच्या भावात शनिवार, २९ एप्रिल रोजी एकाच दिवसात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७५ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. सोन्याच्याही भावात १०० रुपयांची वाढ होऊन ते ६० हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
२५ एप्रिल रोजी चांदीच्या भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ती ७५ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र तिचे भाव कमी होत जाऊन २८ रोजी ती ७४ हजार ५०० रुपयांवर आली होती. मात्र शनिवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ७५ हजार रुपयांवर पोहचली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी-अधिक होत असल्याने सोने-चांदीत चढ-उतार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.