मुक्ताईनगरसाठी 51 कोटी 72 लाखांचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:37 PM2017-06-28T12:37:46+5:302017-06-28T12:37:46+5:30
राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील मुक्ताईनगरचा समावेश करण्यात आला
Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28 - राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील मुक्ताईनगरचा समावेश करण्यात आला असून या भागाचा सर्वागीण विकास करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 51.72 कोटी रुपयांचा विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आह़े यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखून ही कामे वेळेत व दज्रेदार होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मंगळवारी दिले.
राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली़
या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे, अधीक्षक जिल्हा कृषि अधिकारी विवेक सोनवणे उपस्थित होते.
असा आहे प्रकल्प आराखडा
24 तास जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 9 कोटी रुपये, स्वच्छतेच्या उपाययोजनांसाठी 6़93 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 1़3 कोटी, गटार व चा:या बांधण्यासाठी 10़79 कोटी, स्ट्रीट लाईटसाठी 51 लाख, बस स्टॉप बांधण्यासाठी 12 लाख, गॅस कनेक्शनसाठी 5 लाख, असा आराखडा आहे.