'माइलस्टोन' कार्यक्रमात ५१८ विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:26+5:302021-06-27T04:12:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय येथे नुकताच माईलस्टोन कार्यक्रमातंर्गत विविध स्पर्धा पार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय येथे नुकताच माईलस्टोन कार्यक्रमातंर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. यात तब्बल ५१८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ.बी.व्ही. पवार यांच्याहस्ते माइलस्टोन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस.वाणी, उपप्राचार्य डॉ.एस.पी.शेखावत, डॉ.अमोल लांडगे, डॉ.के.पी.अढिया आदी उपस्थित होते. विविध विषयांवर वाद विवाद स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये ५१८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
संजय शेखावत यांनी विद्यार्थ्यानी नवनवीन कौशल्ये शिकून तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे सांगितले. आभार प्रदर्शन प्रा. दिनेश पुरी यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा.फारूक चव्हाण, प्रा.अतुल करोडे, प्रा. डी. बी. सदाफळे , डॉ. एन. वाय. घारे, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. रिचा मोदियानी, प्रा. सारिका पवार, प्रा. एस. एच. राजपूत, डॉ. के. एस. पाटील , प्रा. व्ही. एस. पवार, प्रा. शेख वसीम, प्रा. सतपाल राजपूत, प्रा. अश्विनी राजपूत तसेच पुष्कर भारंबे, तुषार चौधरी, देवयानी पाटील, अवनी पंडित आणि अंकित जांगड आदींनी परिश्रम घेतले.