अभाविपचे ५२ वे प्रदेश अधिवेशन जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 07:39 PM2017-11-08T19:39:42+5:302017-11-08T19:40:26+5:30

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२ व्या प्रदेश अधिवेशनाचे आयोजन जळगावात २४ ते २६ डिसेंबर दरम्यान शिवतीर्थ मैदानावर करण्यात आले आहे. अधिवेशनाची स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे.

52th Pradesh convention of ABVP in Jalgaon | अभाविपचे ५२ वे प्रदेश अधिवेशन जळगावात

अभाविपचे ५२ वे प्रदेश अधिवेशन जळगावात

Next
ठळक मुद्दे२४ ते २६ डिसेंबरदरम्यान होणार अधिवेशन : स्वागताध्यक्ष म्हणून अशोक जैन तर ललित चौधरी स्वागत सचिव२ हजार विद्यार्थी होणार सहभागी

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.८,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या  ५२ व्या  प्रदेश अधिवेशनाचे आयोजन जळगावात २४ ते २६ डिसेंबर दरम्यान  शिवतीर्थ मैदानावर करण्यात आले आहे. अधिवेशनाची स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे. या स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून अशोक  जैन व सचिव ललित चौधरी यांची निवड करण्यात आल्याची माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अभाविपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी दिली.

यावेळी अभाविपचे मनिष जोशी, महानगराध्यक्ष भुषण राजपूत, अभाविप महानगरमंत्री विराज भामरे, सहकार भारतीचे दिलीप पाटील, संजय बिर्ला, सतिष मोरे यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी उपस्थीत होते.   हे अधिवेशन ‘संस्कार व रोजगार युक्त शिक्षण’ या विषयाला अनुसरून असणार असल्याचे डॉ.मुंढे यांनी सांगितले.

या प्रस्तावांवर होणार चर्चा
१.अधिवेशनात शैक्षणिक, सामाजिकस्थिती , विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची सद्यस्थिती व उत्तर महाराष्ट्र स्थिती या विषयावर प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. सद्य घडामोडींवर प्रतिनिधींच्या माहितीसाठी काही विषयांवर समांतर सत्र असणार आहेत. यामध्ये जीएसटी, स्वदेशी असे विषय असतील व रोजगाराची सद्यस्थिती या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये तज्ञ लोकांना बोलवण्याचा मानस आहे.
२. अधिवेशनात अ.भा.वि.प प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री यांची निवड होणार आहे. अधिवेशनासाठी उद्घाटक म्हणुन शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना बोलावले जाणार आहे व या सोबत महिला खेळाडू व सिनेसृष्टीतील व्यक्तीला बोलावण्याचा मानस असल्याचे डॉ.मुंढे म्हणाले.

२ हजार विद्यार्थी होणार सहभागी
अधिवेशनासाठी महाराष्ट्र प्रांतातून २ हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. २५ डिसेंबर रोजी शोभा यात्रा असेल, या शोभा यात्रेचा समारोप एका जाहीर सभेत होईल. ज्यामध्ये महाराष्ट्रातुन आलेल्या काही विद्यार्थी नेत्यांचे महाराष्ट्राच्या सद्याच्या शैक्षणिक व सामाजिक विषयांना धरून भाषणे होतील. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे, ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राची लोक संस्कृती आणि  जनजाती संस्कृतीचे दर्शन होईल व अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अ.भा.वि.प महाराष्ट्राच्या अन्य पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्यांची निवड होईल. अशी माहिती डॉ. मुंढे  यांनी दिली.

अधिवेशन समिती गठीत
संपूर्ण अधिवेशनाची स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे. या स्वागत समितीचे अध्यक्ष जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन  व सचिव ललित चौधरी हे असणार आहेत. कार्याध्यक्ष म्हणून डॉ. प्रताप जाधव, व्यवस्थानप्रमुख भानुदास येवलेकर असणार आहेत अशी घोषणा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.ज्ञानोबा मुंढे यांनी केली. या वेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वागतअध्यक्ष या पदाचा पदभार स्वीकारत असल्याचे सांगीतले. जळगाव शहरात वेगवेगळे अधिवेशन, चर्चासत्र, सेमिनार यासह विविध उपक्रम होत असतात. चांगल्या कायार्साठी शहरातील चांगली मंडळी एकत्रीत येते ते कार्य एखाद्या संस्थेचे नसून शहराचे असते यासाठी सर्वांनी या अधिवेशनासाठी सहकार्य करावे असे आवाहन स्वागत अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

Web Title: 52th Pradesh convention of ABVP in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.