जळगाव जिल्ह्यातील पाटणादेवी येथे ५३वे मराठी विज्ञान संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 04:06 PM2018-03-25T16:06:41+5:302018-03-25T16:08:09+5:30

राज्यपालांची उपस्थिती : पाचशेहून अधिक प्रतिनिधी येणार, नोव्हेंबरमध्ये आयोजन

 53th Marathi Science Sammelan at Patnadevi in ​​Jalgaon District | जळगाव जिल्ह्यातील पाटणादेवी येथे ५३वे मराठी विज्ञान संमेलन

जळगाव जिल्ह्यातील पाटणादेवी येथे ५३वे मराठी विज्ञान संमेलन

Next
ठळक मुद्दे५३वे मराठी विज्ञान संमेलन हे पाटणादेवी येथेच घ्यावे. याबाबत स्वत: राज्यपाल सी. विद्यासागर राव आग्रही असल्याचे अ.पां.देशपांडे यांनी सांगितले. संमेलनास ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह रा संमेलनात चाळीसगाव शिक्षण संस्था, राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्था, सर्वोदय शिक्षण प्रसारक, शिशुविहार शैक्षणिक संस्था, गुरुकुल शिक्षण, म. फुले शिक्षण मंडळ, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ टाकळी प्र.दे. आदी शिक्षण संस्था, शालेय विद्यार्थी, शेतकरी आदींचा सहभाग असण खान्देशातील शेतीशी निगडित समस्यांवर मंथन आणि परिसंवाद होतील. संमेलनात भास्कराचार्यांचे जीवन दर्शन, त्यांचे खगोलीय व गणिती साहित्य यांचा परिचयदेखील करून दिला जाणार आहे.

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.२५ : गणित शिरोमणी भास्कराचार्य यांच्या तपोभूमीचा परिचय व्हावा यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून विज्ञानाचे सोपे आकलन व्हावे यासाठी ५३व्या मराठी विज्ञान संमेलनाचे पाटणादेवी येथे नोव्हेंबरमध्ये आयोजन करण्यात येत असून, राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्यासह शास्त्रज्ञही उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे मुंबई येथील कार्यवाह अ.पां. देशपांडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. देशपांडे यांनी रविवारी सकाळी १० वाजता पाटणादेवी परिसराला भेट देऊन आढावा घेतला.
पाटणादेवी परिसरात जागतिक दजार्ची ‘मॅथसिटी' साकारण्याचा सरकारचा मनोदय आहे. गेल्या वर्षी तशी घोषणाही अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केली होती.
गणित शिरोमणी भास्कराचार्य यांनी याच परिसरात साधना करून गणितीय ग्रंथ साकारले. त्यांच्या तपोभूमीला उजाळा मिळावा म्हणूनच दोन दिवसीय मराठी विज्ञान संमेलन नोव्हेंबरमध्ये घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमी पहिली बैठक १४ जानेवारी रोजी झाली. रविवारी दुसऱ्या बैठकीत पाटणादेवी परिसराचा आढावा घेण्यात आला. यावेळी परिषदेचे मुंबई येथील कार्यवाह दिलीप हेरलेकर, सदस्य अभय यावलकर यांच्यासह चाळीसगाव शाखेचे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, अ.वा. बागड, कार्यवाह डी.टी.पाटील, कोषाध्यक्ष सी.सी.वाणी, प्रकल्पप्रमुख सुशांत जगताप आदी उपस्थित होते.




 

Web Title:  53th Marathi Science Sammelan at Patnadevi in ​​Jalgaon District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.