आत्मनिर्भर योजनेतंर्गत उभारलेल्या कंपनीचा ५५ कोटींचा टर्न ओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:39 AM2021-01-13T04:39:29+5:302021-01-13T04:39:29+5:30

जळगाव : कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि विदेशी साधन सामुग्रीचा वापर न करता आत्मनिर्भर होण्यासाठी अनुभवाला परिश्रमाची ...

55 crore turnover of the company set up under Atmanirbhar Yojana | आत्मनिर्भर योजनेतंर्गत उभारलेल्या कंपनीचा ५५ कोटींचा टर्न ओव्हर

आत्मनिर्भर योजनेतंर्गत उभारलेल्या कंपनीचा ५५ कोटींचा टर्न ओव्हर

Next

जळगाव : कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि विदेशी साधन सामुग्रीचा वापर न करता आत्मनिर्भर होण्यासाठी अनुभवाला परिश्रमाची जोड देत अनिकेत भालचंद्र पाटील या युवकाने तब्बल ५५ कोटींचा टर्न ओव्हर असलेल्या सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेटच्या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचा वाढीव प्लांट कडगाव रस्त्यावर लवकरच सुरु होत आहे.

अनिकेत पाटील हे जळगाव पीपल्स बँकेत संचालक म्हणून गेल्या पाच वर्षापासून आहेत. ९ हजार टन क्षमता असलेल्या सिंथेटीक आर्यन ऑक्साईडच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांची सुरु असलेली वाटचाल ही युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

आत्मनिर्भर योजनेतंर्गत सुरु करण्यात आलेल्या या कंपनीमध्ये सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेट तयार केले जात आहे. याचा वापर पेपर, प्लॅस्टीक, सनमाईक यासह काँक्रीट व पेव्हर ब्लाॅकसाठी वापरण्यात येणाऱ्या लाल व पिवळ्या रंगात केला जातो. एशियन, बर्जर, नॅरोलॅक या कंपन्यांना कच्चा माल पुरविण्याचे काम अनिकेत यांच्या कंपनीकडून केले जात असते.

आत्मनिर्भर योजनेतंर्गत सुरु करण्यात आलेल्या या कंपनीमध्ये सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेट तयार केले जात आहे. याचा वापर पेपर, प्लॅस्टीक, सनमाईक यात केला जातो.

सर्वत्र कुशल मनुष्यबळाची अडचण आहे. प्रत्येक उद्योगाला ही समस्या भेडसावत असते. त्यावर मात करण्यासाठी आम्ही यांत्रिकीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला. अत्याधुनिक यंत्र सामग्रीमुळे कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त काम करता येत आहे. यासाठी स्वत: ग्रेड तयार केले.

शिक्षण घेत असताना केले कंपनीत काम

अनिकेत पाटील यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे जळगाव शहरात झाले आहे. त्यानंतर ११ वी व १२ वी हे मुंबईत झाले. पुढे डी.जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबई येथे बी.ई.केमिकल्सची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबई येथील एस.पी. जैन काॅलेजमध्ये एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला. या दरम्यान शिक्षणासोबतच कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करण्यास अनिकेत यांनी सुरुवात केली. शिक्षणाला अनुभवाची जोड मिळाल्याने त्याचा लाभ हा भविष्यात कंपनीच्या कामकाजात झाला. शिक्षणाच्या वेळी शिक्षण घेतल्यास पुढे काम करताना अडचणी येत नसल्याचे अनिकेत सांगतात.

कोट

विद्यार्थी दशेत असताना जास्तीत जास्त शिक्षण कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अनेकदा शिक्षण घेण्याच्या काळात आपण मित्र, काॅलेज कट्टा, चित्रपट, माैजमजा या साऱ्याला प्राधान्य देत असतो. त्यामुळे आपल्याला पदवी तर मिळते मात्र सखोल ज्ञान मिळत नाही. मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतो त्यावेळी अडचणी येतात. त्यामुळे तरुणांनी त्या-त्या वेळी शिक्षणाला महत्व द्यावे

: अनिकेत पाटील, उद्योजक.

Web Title: 55 crore turnover of the company set up under Atmanirbhar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.