पाचोरा तालुक्यात खरिपाच्या ५५ टक्के पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:45+5:302021-06-22T04:12:45+5:30
तालुक्यात कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी व कडधान्याची पेरणी लागवड करण्यास सुरुवात केली होती. मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा ...
तालुक्यात कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी व कडधान्याची पेरणी लागवड करण्यास सुरुवात केली होती. मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यामुळेच ५५ टक्के टक्के पेरण्या आटोपल्या. त्यात तालुक्यातील कापसाचे लागवडी योग्य क्षेत्र ४५ हजार ७६० हेक्टर असताना त्यापैकी ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड, पेरणी करण्यात आली आहे. यातील सुमारे २० हजार हेक्टर हे ठिबक सिंचनवर आधारित असल्याने त्या पिकांचे नुकसान होणार नाही. मात्र १२ हजार हेक्टरवर कापूस पेरणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
चौकट
सोयाबीन, मका पेरणी संकटात
सोयाबीनचे तालुक्याला १,०४५ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट असून यापैकी ६७० हेक्टरवर सोयाबीन पेरणी आटोपली आहे. तसेच मका पिकाचे ५,७२८ हेक्टर उद्दिष्ट असून त्यापैकी २,०२१ हेक्टरवर मक्याची लागवड, पेरणी केली. दरम्यान पावसाने अचानक उघडीप दिल्याने खरीप लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. कापूस बियाणे पेरणीला हेक्टरी १० हजार रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना खर्च आला असून हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.