शहरातील ५८ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:10+5:302021-06-04T04:13:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ५८ रुग्णांनी गुरुवारी कोरेानावर मात केली तर, १३ नवे बाधित रुग्ण आढळून आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील ५८ रुग्णांनी गुरुवारी कोरेानावर मात केली तर, १३ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू नसल्याने दिलासा मिळाला आहे. ग्रामीणमध्येही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३८६ वर आलेली आहे.
जिल्हाभरातील ११ तालुक्यात १० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. यात धरणगावात एकही रुग्ण नसून, यावल तालुक्यात एक बाधित आढळून आला आहे. मुक्ताईनगर, बोदवड येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. मृतांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील ६० व ८० वर्षीय महिला, जामनेर तालुक्यातील ४६ वर्षीय पुरुष, मुक्ताईनगर तालुक्यातील ४५ वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील २८ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. यातील दोन मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेले आहेत.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी घटली
गुरुवारी आरटीपीसीआर तपासणींचे ४,३५८ अहवाल समोर आले, यात ५९ बाधित आढळून आले आहेत. हे प्रमाण १.३५ टक्के आहे तर अँटिजनच्या ४,२५८ चाचण्यांमध्ये ८१ बाधित आढळून आले आहेत. हे प्रमाण १.९० टक्के आहे. त्यामुळे दैनंदिन पॉझिटिव्हिटीमध्येही दिवसेंदिवस घट दिसून येत आहे.