जिल्ह्यात ५८२१ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:21 AM2020-12-30T04:21:54+5:302020-12-30T04:21:54+5:30
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात मंगळवारी एकूण पाच हजार ८२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात मंगळवारी एकूण पाच हजार ८२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत सात हजार ३४ अर्ज दाखल असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे बुधवारी गर्दी होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक अर्ज पाचोरा तालुक्यातून
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी मंगळवार, २९ डिसेंबर रोजी पाच हजार ८२१अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नव्हता. दुसऱ्या दिवशी २४ रोजी एकूण ७० अर्ज दाखल झाले होते. सोमवार, २८ रोजी दाखल एक हजार १४३ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी सर्वाधिक ७५२ अर्ज पाचोरा तालुक्यात दाखल झाले. त्या खालोखाल जळगाव तालुक्यात ६५६, चाळीसगाव तालुक्यात ६३०, चोपडा तालुक्यात ४५१ व जामनेर तालुक्यात ४३९ अर्ज दाखल झाले. सर्वात कमी १४४ अर्ज बोदवड तालुक्यात दाखल झाले.
तालुका निहाय अर्जांची संख्या
तालुका मंगळवारी दाखल एकूण
जळगाव ६५६ ८१६
जामनेर ४३९ ५९३
धरणगाव १९२ २४५
एरंडोल २२० २५९
पारोळा ३२५ ३६७
भुसावळ २८८ ३३१
मुक्ताईनगर ३७४ ३९८
बोदवड १४४ २१४
यावल ४०३ ४७७
रावेर ४०७ ५१९
अमळनेर २८९ ३५२
चोपडा ४५१ ५६४
पाचोरा ७५२ ८५५
भडगाव २५१ ३०२
चाळीसगाव ६३० ७४२