५९ गावांचा कृती आराखडा तयार
By admin | Published: April 13, 2017 12:24 AM2017-04-13T00:24:40+5:302017-04-13T00:24:40+5:30
संभाव्य पाणीटंचाई आढावा : १३ पैकी सहा लघु पाटबंधारे तलावा कोरडेठाक
चाळीसगाव : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ५९ गावांचा पाण्याचा संभाव्य कृती आराखडा तयार आहे. अद्यापपावेतो कुठल्याही गावाला पाणीटंचाईची झळ बसली नाही, मात्र तालुक्यातील वाघळी ग्रा.पं.च्या वतीने पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील १४३ पैकी ५९ गावांचा संभाव्य पाणी कृती आराखडा ग्रा.पं.च्या मागणीनुसार तयार करण्यात आला असून या गावांना २१० उपाययोजना प्रस्तावित आहेत.
या कृती आराखड्यात बिलाखेड, खेरडे, टाकळी प्र.दे. घोडेगाव या चार गावांना विहीर खोलीकरण मंजूर आहे. एप्रिल ते जूनपर्यंत संभाव्य पाणीटंचाई असलेल्या ओढरे, बोरखेडे बु।।, भऊर, चांभार्डी खुर्द, दहिवद, देवळी, दरेगाव, डामरुण, डोणदिगर, जामडी, जुनोने , कळमडू, राजमाने, अभोणे, अभोणेतांडा, कोदगाव, गणपूर, खडकीसीम, खेडगाव, मांदुर्णे, न्हावे, ढोमणे, पिलखोड, पिंपळगाव, पिंपरखेड, गोरखपूर, सायगाव, शिंदी, शिरसगाव, उंबरखेडे, वडाळा-वडाळी, वरखेडे खुर्द, वाघळी, तळोंदे प्र.चा, पाथरडे, तामसवाडी, राजदेहरे या गावांना पाणीटंचाई भासू शकते. या गावांना संभाव्य पाणी कृती आराखड्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्याप या गावांकडून पाणीटंचाई नसल्यामुळे कुठलीही मागणी करण्यात आली नाही. दरम्यान वाघळी गावाचा पाणीटँकरचा प्रस्ताव पं.स.ला प्राप्त झाला आहे. कुठल्याही गावाला पाणीटंचाई उद्भवल्यास किंवा प्रती माणसी २० लीटरपेक्षा कमी पाणी एखाद्या गावाला मिळत असेल तर त्या गावाला पाणीटंचाईची उपाययोजना करण्यात येते. त्यानुसार वरील गावे संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात घेण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पाचोरा यांचेकडून प्राप्त झाली आहे.
६ तलावात मृतसाठा
चाळीसगाव तालुक्यातील १३ लघुपाटबंधारे पैकी ६ तलावात मृतसाठा शिल्लक आहे. उर्वरित ७ पैकी ४ गावांची स्थिती बºयापैकी आह. तीन तलाव मात्र काठावर आहेत.
(वार्ताहर)
ुपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी ल.पा. तलावांमध्ये ज्या शेतकºयांनी विजेचे पंप आहेत, त्यांना पाटबंधारे विभागातर्फे नोटिसा देण्यात आल्या आहेत. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयानेदेखील संबंधित ठिकाणच्या वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित करावा, असे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.