५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:06 PM2019-05-18T18:06:07+5:302019-05-18T18:07:04+5:30
५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार असून, टेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसºया क्रमांकावर असल्याचे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ज्ञ प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले.
भुसावळ, जि.जळगाव : ५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार असून, टेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसºया क्रमांकावर असल्याचे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ज्ञ प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकॉम विभागात शनिवारी आयोजित ५ जी तंत्रज्ञानावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
टेलिकॉमचा कल्पनातीत वेग चक्रावून टाकणारा आहे. शिवाय हा वेग प्रत्येक दशकात किंबहुना प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे. पूर्वी एखादा बदल होण्यास १० वर्षे लागत असतील तर तोच बदल आता १ वर्षांत होतो. स्मार्टफोनसारखी सुविधा त्यांनी अतिशय कमी काळात आत्मसात केली आहे. जगात टेलिकॉमच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार भारताने केला आहे. त्याचप्रमाणे टेलिकॉम क्षेत्राला लागणाºया पायाभूत सुविधा येथे इतर देशांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच भारत हा टेलिकॉमच्या क्षेत्रात चीन नंतर दुसºया क्रमांकावर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी फोन्समध्ये वापरल्या जाणाºया ५ जी तंत्रज्ञानचा एक भाग क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसरवर मार्गदर्शन केले, तर नवीन तंत्रज्ञानामुळे होणारे बदल व फायदे प्रा.गजानन पाटील यांनी सांगितले.
दोन सत्रात चाललेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम विभागातील विभागप्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील, नितीन पांगळे ह्या आठ तज्ञ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.
नवीन तंत्रज्ञानाचे फायदे : प्रा.गजानन पाटील
टेलिकॉम क्षेत्राने लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आणले आहे. आता छोट्या गावातील व्यापाºयाचे जगभर ग्राहक आहेत आणि ते आॅनलाइन उत्पादनांची विक्री करीत आहेत. छोट्या गावातील लोक विशेषत: ब्रॅण्डच्या गुणवत्ता उत्पादनांचे आॅर्डर करू शकतात जे त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध नाहीत. अगदी लहान व्यापारी, हस्तकला व्यापारी, स्थानिक सेवा प्रदाते स्वत:साठी, बाजार शोधण्यासाठी व्हॉट्सअप, हाइक, फेसबूक इत्यादी मोबाइलचा वापर वापरतात. या नवीन तंत्रज्ञानामुळे ई-कॉमर्स, बीपीओ आणि व्यवसाय संधी वाढविण्यासारख्या उद्योगांच्या निर्मितीत वेगाने वाढ होईल.
महामार्ग, सर्वत्र मोबाईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक इंटरनेट प्रवेश कार्यक्रम, ई-शासन, ई-क्रांती (ज्याचा उद्देश इलेक्ट्रॉनिक सेवा देण्यासाठी आहे), सर्व माहिती क्षणात उपलब्ध होईल व या सर्व क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील, अशी माहिती प्रा.गजानन पाटील यांनी दिली.