‘अतिक्रमण निर्मूलन’चे ६ कर्मचारी निलंबित

By admin | Published: March 2, 2017 12:56 AM2017-03-02T00:56:00+5:302017-03-02T00:56:00+5:30

मनपा आयुक्तांचे आदेश : जप्त मालाची विल्हेवाट व पैसे मागणे भोवले

6 employees of 'encroachment eradication' suspended | ‘अतिक्रमण निर्मूलन’चे ६ कर्मचारी निलंबित

‘अतिक्रमण निर्मूलन’चे ६ कर्मचारी निलंबित

Next

जळगाव : दादागिरी,  शिवीगाळ करणे, अतिक्रमणधारकांकडून पैसे मागणे, जप्त केलेला माल परस्पर विकणे आदी आरोपांवरून अतिक्रमण निर्मूलन विभागातील ६ कर्मचाºयांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यात वाहनचालक साजीद अली आबीद अली, मोहसीन शेख आसीफ, मोहन गवळी, गीता अटवाल, आनंद गोयर, नीलेश चव्हाण यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.
मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांबाबत सातत्याने पैसे मागितल्याच्या तसेच शिवीगाळ करणे, जप्त मालाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या तक्रारी येत आहेत. मंगळवारी झालेल्या महासभेत तर याविषयावरून जोरदार चर्चा झाली. भाजप नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी फोटोसह तक्रार करूनही आयुक्त कारवाई करीत नसल्याचा आरोप केला. नेमके त्याच दिवशी सायंकाळी समांतर रस्त्यावरील कारवाईत जप्त केलेल्या सामानातील लोखंडी पोलची शिक्षण मंडळ कार्यालयाच्या आवारात उभ्या अतिक्रमण विभागाच्या ट्रकमधून विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे आढळून आले.
 त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच आयुक्तांनी त्याची दखल घेत आधीच विविध तक्रारींवरून चौकशी सुरू असलेल्या अतिक्रमण विभागाच्या ६ कर्मचाºयांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
अजिंठा चौक ते गोदावरी अभियांत्रिकीपर्यंतचे अतिक्रमणे हटलिवी
तिसºया दिवशी महामार्गावरील अजिंठा चौक ते गोदावरी अभियांत्रिकीपर्यंतचे अतिक्रमणे हटविण्यात आली. आता या जागेवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाही, याकडे मनपा व प्राधिकरणाला लक्ष द्यावे लागणार आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाने आता समांतर रस्त्यावर ठिकठिकाणी टाकण्यात आलेले ढिगारे पसरविणेही आवश्यक आहे. ते पसरविल्यास रस्ता वापरता येईल. समांतर रस्त्यांसाठी तयार करण्यात येणाºया डीपीआरचे कामही जोरात सुरु आहे. दरम्यान, साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली असली तरी काही लोटगाड्या, टपºया महामार्गालगत लपविण्यात आल्या आहेत, त्यांचाही शोध घेणे आवश्यक आहे.

सतरा वर्षांपासून असलेले अतिक्रमणे जमिनदोस्त
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांपासून महामार्गालगतचे अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे़ बुधवारी तिसºया दिवशी अजिंठा चौक ते खेडीपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले़ सतरा वर्षापासून याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेकांनी शेड तसेच पक्के सिमेंटचे बांधकाम तसेच लाकडी पाट्यांचे शेड तयार केले होते़ कारवाईत ते जमीनदोस्त करण्यात आले़

किरकोळ वाद वगळता मोहीम शांततेत
बुधवारी अजिंठा चौफुलीपासून पुढे मोहीम राबविण्यात येत असताना एस.टी. वर्कशॉपजवळील क्वॉर्टर्सजवळ भिंतीलगत असलेल्या फर्नीचरच्या दुकानाचे अतिक्रमण हटवित असताना वाद झाला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेपकरीत वाद मिटविला.
हातगाडी, टपरी व फलक जप्त
या मोहीमेत हातगाडी, सलून टपरी, भंगार तार,लोखंडी पाईप, पत्रे, लोखंडी व साधे फलक याप्रकारचे ३५ साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्वाधिक ५०१ लोखंडी मोठे पाईप व लहान पाईप जप्त करण्यात आले.याशिवाय खुर्च्या व लाकडी बाक, लोखंडी फलक, चौकोनी पाईप जप्त करण्यात आले.
अजिंठा चौफुलीवर एका खाजगी हॉटेलसमोर महामार्गालगत भुसावळकडे जाणारी खाजगी वाहने लागतात़ या वाहनधारकांकडून महामार्गावर प्रवाशांची उतरचढ करण्यात येते़ ही वाहने वाहतुकीची कोंडी होण्यास कारणीभूत ठरतात़ अशा बेशिस्त वाहनांवरही कारवाई करावी किंवा त्यांना थांब्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे़

Web Title: 6 employees of 'encroachment eradication' suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.