मेहरुण तलावावर विसर्जनादरम्यान आढळली ६ फुटाची गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:52+5:302021-09-22T04:18:52+5:30

जळगाव : मेहरुण तलावावर विसर्जनाच्या दिवशी सहा फुटाची गणेशमूर्ती आढळून आली. शासनाच्या नियमापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असल्याने याप्रकरणी मंगळवारी ...

A 6 feet idol of Ganesha was found during immersion on Mehrun Lake | मेहरुण तलावावर विसर्जनादरम्यान आढळली ६ फुटाची गणेशमूर्ती

मेहरुण तलावावर विसर्जनादरम्यान आढळली ६ फुटाची गणेशमूर्ती

googlenewsNext

जळगाव : मेहरुण तलावावर विसर्जनाच्या दिवशी सहा फुटाची गणेशमूर्ती आढळून आली. शासनाच्या नियमापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असल्याने याप्रकरणी मंगळवारी सिंधी कॉलनी येथील जय समाधा गणेश मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मेहरुण तलावावर रविवारी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आल्या. मनपा, पोलीस प्रशासनातर्फे येथे व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. विसर्जन सुरु असताना मेहरूण तलावावर रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सिंधी कॉलनीतील जय समाधा गणेश मित्रमंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी आली. यावेळी बंदोबस्तावरील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मंडळाची गणेशमूर्ती ही सहा फूट उंचीची असल्याचे लक्षात आले. शासनाने केवळ चार फुटापर्यंतच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यास परवानगी दिली होती. शासन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ मुंढे यांच्या फिर्यादीवरून जय समाधा गणेश मित्रमंडळाच्या संदीप पंजुमल मंधान (वय ३४, रा. संत राजाराम नगर, सिंधी कॉलनी) या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

Web Title: A 6 feet idol of Ganesha was found during immersion on Mehrun Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.