घरकुलांची कामे सुरू न करणाऱ्या ६० जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:26 AM2018-08-20T01:26:02+5:302018-08-20T01:29:39+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील घरकुले मंजुर झालेल्या शंभर लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानाचा हप्ता मिळूनही घरकुलांचे काम सुरू केले नाही, असे आढळून आल्याने गटविकास अधिकाºयांनी चौैकशी करण्यासाठी सहा भरारी पथके नेमली आहेत. दरम्यान, गेल्या चार पाच दिवसात पथकांनी ६० लाभार्र्थींची भेट घेऊन त्यांना काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असून अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 60 people inquired about not doing homework | घरकुलांची कामे सुरू न करणाऱ्या ६० जणांची चौकशी

घरकुलांची कामे सुरू न करणाऱ्या ६० जणांची चौकशी

Next
ठळक मुद्दे१७ गावांमध्ये मंजुर आहेत शंभर घरकुले ६ भरारी पथकांकडून तालुक्यात चौकशी सुरू

मुक्ताईनगर जि. जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील जवळपास शंभरावर घरकुलांची कामे ही शासकीय अनुदानाचा हप्ता घेऊन देखील सुरुच न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गटविकास अधिकारी डी. आर. लोखंडे यांनी चौकशीसाठी ६ भरारी पथकांची नेमणूक केली आहे.
दरम्यान, या पथकांनी आतापर्यंत तालुक्यात ६० लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांना कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण तालुक्यात हे भरारी पथके फिरत असून ज्यांची कामे सुरू झालेली नाही, त्यांना तत्काळ कामे सुरू करण्यास सांगण्यात येत आहे, ३१ आॅगस्टपर्यंत काम सुरू न करणाºया लाभार्थींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले.
अपूर्ण अवस्थेत असलेले किंवा कामे सुरू न करणाºया लाभार्थ्यांची संख्या गावनिहाय अशी- अंतुर्ली १२, मुक्ताईनगर ३०, कुºहा १६, बेलसवाडी १, पिंपरीनांदू १, सुकळी ३ , बोरखेडा १, धामणगाव ८, जोंधनखेडा ३, चिंचखेडा खुर्द ७, काकोडा ४ , पारंबी ३ , पिंपराळा १, वढोदा १, तरोडा ७, सातोड ४ व पिंपरी आकाराऊत ३ अशा एकूण शंभर घरकुलांची कामे अद्यापही सुरू झालेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आलेले आहे.
दरम्यान, ९ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले आहे.
 

Web Title:  60 people inquired about not doing homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर