नवतेजस्विनी महोत्सवात ६० स्टॉल बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 05:53 PM2023-03-25T17:53:41+5:302023-03-25T17:53:52+5:30

या महोत्सवात बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचा प्रदर्शनात मांडणी करण्यात आली आहे.

60 stalls at Navtejaswini Mahotsav displaying various products produced by women of self-help groups | नवतेजस्विनी महोत्सवात ६० स्टॉल बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन

नवतेजस्विनी महोत्सवात ६० स्टॉल बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव :महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्यावतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सवात ६० स्टॉल मांडण्यात आले आहेत. या महोत्सवात बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचा प्रदर्शनात मांडणी करण्यात आली आहे.

 या महोत्सवी प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन आणि जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक आत्मा कुर्बान तडवी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्डचे श्रीकांत झांबरे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ हेमंत बाहेती, जिल्हा नियोजन अधिकारी मानवविकास समिती मनोहर चौधरी, योगेश चौधरी, सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश सुतावणे, सामाजिक कार्यकर्त्या संपदा पाटील आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील यांनी केले. श्रीकांत झांबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात बचत गटाच्या चळवळीतील नाबार्डच्या योगदानाबाबत माहिती दिली. कुर्बान तडवी यांनी प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेचा लाभ घेऊन उद्योजक म्हणुन पुढे यावे असे आवाहन केले. आभार प्रशांत पाटील यांनी मानले. 

६० स्टॉलमध्ये मांडणी

प्रदर्शनात पापड, बिबड्या, कुरड्यासह विविध पदार्थांचे ६० स्टॉल
मध्ये बचत गटांची उत्पादने विक्री सुरु आहे. त्यात खान्देशी मसाले, विविध प्रकारचे पापड, तांदूळ पापड, नागली पापड, बिबड्या, कुरड्या, लोणचे, केळी वेफर्स, केळी कुकीजव, बिस्किट, गारमेंट, हस्तकला वस्तू, लाकडी बैलगाडी, शोभेच्या वस्तू, तोरण विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

तसेच खाद्य पदार्थांचेही स्टॉल लावण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्षानिमित्त तृणधान्याविषयी जनजागृतीसाठी ममुराबादच्या कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिऱ्याचा स्टॉल लावण्यात आला आहे.

Web Title: 60 stalls at Navtejaswini Mahotsav displaying various products produced by women of self-help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.