चाळीसगावला सुदृढ आरोग्यासाठी ६०० महिला धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:31 PM2018-03-07T13:31:15+5:302018-03-07T13:31:15+5:30
महिला दिनानिमित्त आयोजन
आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जळगाव, दि. ७ - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सुदृढ आरोग्यासाठी शहरातील ६०० पेक्षा जास्त महिला रस्त्यावर धावणार आहेत. आरोग्यासाठी धावण्याचे महत्व याचा संदेश त्या देणार आहे.
युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन तसेच जिजाऊ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मॅरेथॉन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानापासून पहाटे सहा वाजता स्पधेर्ला सुरुवात होईल. तेथून अंधशाळामार्गे तहसील कार्यालय, सिग्नल पॉईंटमार्गे तहसील कार्यालयापासून पोलीस कवायत मैदानावर पोहचेल. स्पधेर्चे उदघाटन व हिरवी झेंडी चाळीसगाव सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुनीता गिरडकर, स्मिता बच्छाव, डॉ. उज्वला देवरे, सोनल साळुंखे यांच्या उपस्थितीत दाखवली जाणार आहे. तसेच स्पधेर्नंतर मनोरंजनात्मक व संगीताचा कार्यक्रम होईल. महिलांनी मोठ्या संख्येने नावे नोंदवून स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे. विजेत्या तीन महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आठ रोजी देखील पहाटे साडे पाच वाजता नाव नोंदवून सहभागी घेता येईल.