टेलिफोन ऑपरेटरला ६० हजारांचा ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:21+5:302021-06-30T04:11:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुंबई येथून बीएसएनएल केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या मोबाईल नंबरचे केवायसी अपडेट ...

60,000 online bribe to telephone operator | टेलिफोन ऑपरेटरला ६० हजारांचा ऑनलाइन गंडा

टेलिफोन ऑपरेटरला ६० हजारांचा ऑनलाइन गंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुंबई येथून बीएसएनएल केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या मोबाईल नंबरचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने संजय भिमराव पाटील (वय ५२ रा. मुक्ताईनगर, जळगाव) यांची ६० हजार १८५ रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय भिमराव पाटील हे शिरसोली रोडवरील जैन हिल्स येथे टेलीफोन ऑपरेटर म्हणून नोकरीला आहेत. १४ जून रोजी घरी असतांना दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी ८३८९०२९४८१ या क्रमांकावरुन एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. बीएसएनएल सर्व्हिस केअर सेंटर मुंंबई येथून बोलत असून मोबाईल नंबरचे केवायएसी अपडेट करायचे असल्याचे सांगून दहा रुपयाचे रिचार्ज करायला सांगितले. पाटील यांनी अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवून रिचार्ज केल्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक अनोळखी व्यक्तीला सांगितला. ओटीपी क्रमांक सांगताच २ तासानंतर संजय पाटील यांच्या खात्यातून सुरुवातीला ३० हजार, त्यानंतर १९ हजार ९०० रुपये, परत १० हजार १६५ असे एकूण ६० हजार १८५ रुपये अनोळखी व्यक्तीने वळते करुन घेतले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर संजय पाटील यांनी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन ८३८९०२९४८१ हा क्रमांक असलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित पाटील करीत आहेत.

Web Title: 60,000 online bribe to telephone operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.