यावल तालुक्यात केळी व मक्याचे 61 लाखाचे नुकसान
By admin | Published: May 8, 2017 05:34 PM2017-05-08T17:34:47+5:302017-05-08T17:34:47+5:30
रविवारी झालेल्या वादळाचा 146 शेतक:यांना फटका
Next
यावल,दि.8- रविवारी दुपारी तालुक्यातील किनगाव परीसरात झालेल्या जोरदार वादळी पावसाने 10 गावातील 146 शेतक:यांचे 68 हेक्टर क्षेत्रातील केळी, मका या पिकांचे सुमारे 61 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त भागाची तहसीलदर कुंदन हिरे यांनी पाहणी केली. खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत सेानवणे यांनी आढावा घेवून तहसीलदार हिरे यांना कार्यवाही बाबत सूचना केली.
रविवारी दुपारी तालुक्यातील किनगाव, डोणगाव, उंटावद, चिंचोली, नायगाव, चुंचाळे, , डांभुर्णी, कोळन्हावी, थोरगव्हाण, मनवेल परीसरास जोरदार पावसासह वादळाचा फटका बसला. तहसीदलदार हिरे यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसान ग्रस्त भागाचे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक मार्फत पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या 10 गावांमधील 146 शेतक:यांचे केळी, मका या दोन पिकांचे 68 हेक्टरमधील 60. 50 लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.