महावितरणचे ६१ कर्मचारी ‘गुणवंत कामगार पुरस्कारा’चे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 09:22 PM2020-08-13T21:22:54+5:302020-08-13T21:23:07+5:30
जळगाव : महावितरण जळगांव परिमंडळाच्यावतीने सन 2019-20 या वर्षात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल ६१ कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने संबंधीत ...
जळगाव : महावितरण जळगांव परिमंडळाच्यावतीने सन 2019-20 या वर्षात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल ६१ कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने संबंधीत विभाग, मंडळ स्तरावर स्वातंत्र्य दिनी सन्मानित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्याने प्रतीवर्षी तांत्रिक सवर्गातील कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी 1 मे 2020 रोजी संपन्न होणारा कामगार पुरस्कार सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला. सदर सोहळा स्वातंत्र्य दिनी 15 आॅगस्ट 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य अभियंता पुरस्कृत उत्कुष्ट कर्मचारी पुरस्कार परिमंडळ कार्यालयातील वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक दत्तात्रय जगन्नाथ निरगुडे यांना सन 2019-20 या कालावधीत वाढीव वीज बिलाच्या तक्रार निराकरणाच्या अनुषंगाने बजाविलेल्या कामगिरीबद्दल जाहिर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
धुळे मंडळ तंत्रज्ञ संवगार्तील पुरस्कार प्राप्त कामगार— धुळे शहर विभागातील विलास दयाराम माळी, मधुकर रामदास तावडे, प्रशांत सुरेश हरळ, संकेत जयवंत वाकडे धुळे ग्रामीण विभागातील राजेंद्र रघुनाथ कोळी, शरद दगा धनगर, ज्ञानेश्वर भिमराव बाविस्कर, जयकुमार संतोष ठाकुर (चाचणी विभाग) व दोंडाईचा विभागातील नितीन गोपीचंद कापुरे, रुपेश रमेश चौधरी, विशाल शिवाजी पाटील, संजय इस्माईल पावरा यंत्रचालक संवर्ग- दिगंबर साहेबराव भदाणे (धुळे शहर विभाग), सुरेंद्र जयसिंग ठाकुर (धुळे ग्रामीण विभाग), जगतराव प्रतापराव पाटील (दोंडाईचा विभाग)
जळगाव मंडळ तंत्रज्ञ संवगार्तील पुरस्कार प्राप्त कामगार— जळगाव विभागातील गलु बुला चौधरी, विलास भोजु बोंडे, बळीराम नामदेव पाटील, अमोल विष्णु भगत मुक्ताईनगर विभागातील नितेश अशोक साठे, रमेश मारोती निकम, आनंदा एकनाथ निकुंभ भुसावळ विभागातील सुनिल पुरुषोत्तम चौधरी, पंकज नारायण येवले, परमेश्वर चिंधु पवार, गिरीष गोपाल झोपे पाचोरा विभागातील विजय प्रभाकर चांदेकर, वाल्मिक कौतीक पाटील, नितीन वसंत खैरनार, निलेश शेषराव गायकवाड, गोकुळ जामसिंग निकुंभ सावदा विभागातील दिपक विश्वनाथ कोळी, गजानन सुका निंबोलकर, शकिल मुजात तडवी धरणगाव विभागातील वासुदेव गोकुळ महाजन, शेखर मधुकर सोनार, कौस्तुभ सुरेश पेंढारे, रमेश उत्तमराव बाविस्कर, प्रकाश भाईदास धनगर चाळीसगाव विभागातील भालचंद्र चिंधा वाघ, नानासाहेब दगा पगार, महादु साहेबराव कोल्हे, मनोज रमेश चिंचोले यंत्रचालक संवर्ग- प्रविण शिवाजी पाटील (जळगाव विभाग), जयंत भिकनराव गायकवाड (चाळीसगाव विभाग), शालिग्राम यशवंत पाटील (धरणगाव विभाग), शंकर मांगो गोरे (मुक्ताईनगर विभाग), सुरेश संतोष मोरे (पाचोरा विभाग), रमजान सुभान तडवी (सावदा विभाग), त्र्यंबक नामदेव फिरके (भुसावळ विभाग)
नंदुरबार मंडळ तंत्रज्ञ संवगार्तील पुरस्कार प्राप्त कामगार—नंदुरबार विभागातील मनोज रंजीत वळवी, अनिल मोहन हटकर, विकासकुमार झेंडू देवरे, अर्जुन देवाजी गावीत शहादा विभागातील गुलाब चतरु पवार, पवनकुमार कैलास भावसार, ब्रिजलाल फकिरा पावरा, किशोर जयसिंग राठोड, मोहन झिपा गवळे यंत्रचालक संवर्ग- घनश्याम आत्माराम सुर्यवंशी (नंदुरबार विभाग), संजय लेहºया पावरा (शहादा)