पाणी टंचाई निवारणासाठी 62 लाखांच्या कामांना मंजुरी
By admin | Published: May 26, 2017 05:17 PM2017-05-26T17:17:18+5:302017-05-26T17:17:18+5:30
धरणगाव तालुक्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात : जळगाव व धरणगाव तालुक्यातील गावांसाठी बोअरवेल, कूपनलिकांचा समावेश
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26- जळगाव ग्रामीण मतदार संघातील 189 गावांपैकी 40 गावांमध्ये पाणी टंचाई निवारणासाठी 69 बोअरवेल व 25 कूपनलिकांच्या कामांसाठी 62 लाख 35 हजार 709 रुपयांच्या कामांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंजुरी दिली आहे. धरणगाव तालुक्यातील काही गावांमधील कामांना सुरुवात झाली आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघात 189 गावे आहेत. त्यापैकी 40 गावांमध्ये पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. धरणगाव तालुक्यातील 26 गावांमध्ये चमगाव, अहिरे बु., निशाणे बु., अहिरे खुर्द, सोनवद खुर्द, कल्याणे खुर्द, वाघलुद खुर्द, फुलपाट, हनुमंत खेडा, सोनवद बुद्रुक, पाळधी खुर्द, मुसळी, बोरखेडा, तरडे, एकलग्न, पोखरी, साकरे, चांदसर, पाळधी बुद्रुक, दहीदुल्ले, निंभोरा, बांभोरी प्र.चा. पष्टाने, पिंम्पळे या गावांमध्ये 45 बोअर वेल व 6 कुपनलिकांच्या कामासाठी 32 लाख 93 हजार 959 रुपये मंजुर केले आहे. तर जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न., जळगाव खुर्द, धानवड, धानवड तांडा, सावखेडा, सुभाषवाडी, भादली, कानसवाडे, आव्हाणे, नांद्रा बुद्रुक, शेळगाव, भोलाणे, फुपनगरी या गावांमध्ये 24 बोअर वेल व 9 कुपनलिका या कामासाठी 29 लक्ष 41 हजार 750 हजार रुपये मंजुर करण्यात आले आहे. या गावांमध्ये तत्काळ व दज्रेदार स्वरुपाची कामे करावी अशी सूचना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका:यांना दिले आहेत.