जलतरण स्पर्धेत ६२ खेळाडूंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:32+5:302021-01-08T04:50:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकलव्य क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर ८ महिन्यांच्या काळानंतर प्रथमच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंची ५० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकलव्य क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर ८ महिन्यांच्या काळानंतर प्रथमच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंची ५० मीटर फ्री स्टाईल आणि १०० मीटर फ्री स्टाईल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ४० मुले आणि २२ मुलींनी सहभाग नोंदवला होता.या वेळी शासनाचे कोविड १९ संदर्भातील सर्व नियम पाळण्यात आले आहेत.
या स्पर्धेसाठी चेतन चौधरी, नवीन पाटील, चंद्रकांत मिस्त्री, कोमल पाटील, रिना पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धा मु.जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यावेळी अखिलेश यादव, भुषण तायडे, नितीन चौधरी, नीलेश खड़के, राजेंद्र नारखेडे, चंद्रलेखा जगताप यांनी परिश्रम घेतले.
के.सी.ई. सोसायटीचे संचालक डी.टी. पाटील यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.
स्पर्धेचा निकाल (प्रथम,द्वितीय, तृतीय अनुक्रमे)
५० मीटर फ्री स्टाईल - सागर सोनवणे, संजीव टेकाव़े, विशाल टेकावडे
मुली - अकांक्षा म्हेत्रे, निधी पाटील, फाल्गुनी सपकाळे
१०० मीटर फ्री स्टाईल - शुभम काळे, कार्तिक काळे, महावीरसिंग पाटील
मुली - आकांक्षा म्हेत्रे, निधी पाटील, प्रचेता चौधरी