अंतिम वर्षातील ६२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:52 PM2020-05-15T12:52:11+5:302020-05-15T12:52:26+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या एकूण ६२ हजार ९५३ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे़ दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात शंका असल्याचे त्याचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाकडून शंका निरसन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़
देशासह राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले़ परिणामी, अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व बंद करण्यात आले़ त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुध्दा बंद होती़ तर महाविद्यालयीन परीक्षांनाही स्थगिती देण्यात आली होती़ दरम्यान, नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाने आॅगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि सप्टेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे सांगितले आहे़ त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून वेळापत्रक निश्चितीसाठी त्याच बरोबर परीक्षांच्या नियोजना संदर्भात रोज बैठका घेऊन नियोजन केले जात आहे़ त्याच बरोबर विद्यार्थ्यांना परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाकडून शंका निरसन कक्षाचीही स्थापना केली आहे़
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून जुलै महिन्यात घेण्यात येणार परीक्षांना अंतिम वर्षातील ६२ हजार ९५३ विद्यार्थी बसतील़ त्यात ३९ हजार ८५० विद्यार्थी तृतीय वर्षाती प्रवेशित नवीन विद्यार्थी तर २३ हजार १०३ रिपीटर विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ तसेच एकूण संख्येत तीन वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे ३९ हजार ४९७ तर दोन वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे १६ हजार ४८७ तसेच चार ते पाच वर्षातील अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील ६ हजार ९६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे़
एकूण २५० परीक्षा होणार
पूर्वीच्या नियोजनानुसार ८५० परीक्षा घेतल्या जाणार होत्या़ मात्र, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता अंतिम वर्षाच्रूा एकूण २५० च्यावर परीक्षा होणार आहेत़ तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेतली जाणार आहे़ त्याबाबत विद्यापीठाकडून सूचना देण्यात येणार आहे़