भुसावळातील 66 जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Published: May 22, 2017 11:16 AM2017-05-22T11:16:32+5:302017-05-22T11:16:32+5:30

भुसावळ शहरात पोलिसांच्या पथकाने चार स्वतंत्र कारवाया करीत 66 जुगारींना गजाआड करीत दोन लाख 27 हजार 795 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

66 gamblers in the gaos | भुसावळातील 66 जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळातील 66 जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

Next

 भुसावळ,दि.22- शहरात अवैधरित्या चालणा:या क्लबसह जुगाराच्या अड्डय़ांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पथकाने चार स्वतंत्र कारवाया करीत 66 जुगारींना गजाआड करीत दोन लाख 27 हजार 795 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़

पहिली कारवाई शहरातील मरीमाता मंदिराजवळील एम़स्पोटर्स असोसिएशनच्या क्लबवर करण्यात आली़ हा क्लब संस्थेचे सदस्य कृष्णा शिंदे चालवत असल्याची माहिती असून ते पसार झाले आहेत़ त्यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती़ 22 हजार 710 रुपयांची रोकड, सात मोबाईल व एक दुचाकी जप्त करण्यात आली़
दुसरी कारवाई शहरातील सुभाष चौकीमागील शेख शकील यांच्या क्लबवर करण्यात आली़ शेख शकील यांच्यासह 29 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती़ 19 मोबाईल व एक दुचाकी तसेच 32 हजार 85 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली़ 
तिसरी कारवाई जाम मोहल्ला, जमजम लॉज भागातील कालू शेख यांच्या क्लबवर करण्यात आली़ कालू शेख यांच्यासह 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती़ 69 हजारांची रोकड, दहा मोबाईल व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या़
कंडारीत नऊ जुगारी जाळ्यात 
कंडारी येथील महादेव टेकडीजवळ टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगारावर पथकाने धाड टाकून नऊ आरोपींना गजाआड केल़े संजय मुरलीधर मोरे, अॅरि ब्रायन सिमेन्स, अनिल प्रकाश सपकाळ, शेख मेहबूब शेख बुडन, रवी तुकारात तायडे, संदीप अशोक प्रजापती, अशोक शामलाल दमाडे, गौतम रंगनाथ देवरे, प्रवीण रघुनाथ महाजन  यांना अटक करण्यात आली़ आरोपींच्या चार दुचाकी, चार मोबाईलसह 20 हजार 170 रुपयांची रोकड अन्य मुद्देमाल मिळून एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
कारवाईत यांचा सहभाग
सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक युवराज अहिरे, आशिष शेळके, नरेंद्र साबळे, हवालदार प्रदीप पाटील, प्रशांत चव्हाण, गुरूबक्ष तडवी, नंदलाल परदेशी, विनोद सपकाळे, दिलीप कोळी, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, राजेश काळे, संदीप चव्हाण, श्रीकांत ठाकूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली़ 

Web Title: 66 gamblers in the gaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.