लेखाधिकाऱ्यांकडे तक्रारीनंतर ६६ हजार बिलातून केले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:49+5:302021-04-19T04:14:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रावेर येथील रुग्णांकडून शासकीय नियमापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या आणखी एका खासगी रुग्णालयाला लेखाधिकाऱ्यांनी चाप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रावेर येथील रुग्णांकडून शासकीय नियमापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या आणखी एका खासगी रुग्णालयाला लेखाधिकाऱ्यांनी चाप दिला आहे. यात शहरातील शिवम कोविड सेंटरमधील रुग्णाकडून शासकीय शुल्कापेक्षा ६६ हजार ३०० रुपये हे अधिक घेतो गेल्याचे लेखापरीक्षणात समोर आल्यानंतर तेवढी रक्कम ही बिलातून कमी करण्यात आली. गेल्या तीन दिवसातील खासगी रुग्णालयांच्या बाबतीत ही तिसरी घटना समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच सारा हॉस्पिटलमध्ये अधिकचे बिल आकारल्याच्या रुग्णाच्या तक्रारीवरून लेखाधिकारी यांनी तातडीने रुग्णालयात जावून तब्बल १ लाखांवर बिल कमी कले होते. त्यानंतर कच्ची व अवास्तव बिले दिल्याच्या तक्रारीवरून ॲक्सॉन कोविड हॉस्पिटलची चौकशी करून त्यात आढळलेल्या त्रुटींवरून या रुग्णालयाची कोविडची मान्यताच रद्द करण्यात आली असून तिसऱ्या दिवशी आता शिवम कोविड सेंटमध्ये अतिरिक्त शुल्क आकरल्याच्या तक्रारीनंतर झालेल्या लेखापरिक्षणात समोर आले. रावेर येथील शेतकरी रमेश कल्लू पवार व त्यांचे वडील कल्लू लखू पवार हे शिवम कोविड सेंटर, जळगाव येथे दाखल होते. त्यांना अनुक्रमे १०,९००० व ६८८०० असे एकूण १,७७,८०० रुपये बिल आकारण्यात आले होते. त्यापैकी ३० हजार रुपये रुग्णांनी जमा केले होते. याबाबत अमोल कोल्हे यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर त्यानी लेखाधिकारी यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर लेखाधिकारी प्रतिक हरिमकर यांना माहिती दिली. हरिमकर यांनी तातडीने लेखापरिक्षण केले असता यात ६६ हजार ५०० रुपये अतिरिक्त बील दिल्याचे समोर आले. त्यानंतर हे बील कमी करून देण्यात आले. मात्र, त्यानंतर संबधित रुग्णालयाकडून जास्त बीलाची मागणी होत असल्याचे नातेवाईकांनी कोल्हे यांना सांगितले. त्यानंतर अखेर डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर लेखाधिकारी यांनी सांगितल्यानुसारच बिल घ्यावे, असे डॉक्टरांनी सांगितले.