खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:53 PM2019-04-30T14:53:42+5:302019-04-30T14:53:48+5:30

पाच लाख रुपयांचे नुकसान : वाढत्या तापमानाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज

68 sheep deaths in Khandekevla | खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा मृत्यू

खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा मृत्यू

Next


खडकदेवळा, ता. पाचोरा : येथे हिवरा प्रकल्प परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपातील तब्बल ६८ मेंढ्या अचानक मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यामुळे नऊ मेंढपाळ मालकांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. अचानकपणे पाळीव मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांमध्ये घबराट पसरली आहे.
खडकदेवळा खुर्द येथील हिवरा प्रकल्पा जवळच गावाच्या परिसरात मेंढपाळ वर्ग सध्या मोठा प्रमाणात दाखल झाला आहे. या मेढपाळांनी रानात चरावयास सोडलेल्या मेंढ्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या खळबळ जनक घटनेत सुमारे ६८ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
सध्या बाजारात पूर्ण वाढ झालेल्या मेंढ्यांचा दर पाहता या मेंढपाळांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ मेंढी पालनावरच त्यांचे कुटुंब अवलंबून असून ऐन दुष्काळी परिस्थित झालेल्या या प्रचंड नुकसानी मुळे मेंढपाळ हवालदिल झाले आहेत. तरी संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी स्वत: नुकसानग्रस्त मेंढपाळ तसेच ग्रामस्थांनी केली आहे.
केला पंचनामा
मृत्यूमुखी पडलेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आला असून त्याचा तपासणी साठी शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या तपासणीतूनच आता ही बाब समोर येणार आहे, की या मेंढ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला.
घटनास्थळी पोहचले अधिकारी
खडकदेवळा खुर्दे येथे मेंढ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. मेढ्यांचे शवविच्छेदन डॉ. ए.आर.महाजन यांनी केले. याचबरोबर तलाठी आर.पी.सिरसाठ यांनी पंचनामा केला. पशू वैद्यकीय अहवाल हा सरकारी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेबाबत तर्कवितर्क लढविले जात असून मेढ्यांच्या खाण्यात काही चुकीचे तर आले नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.
खडकदेवळा खुर्दे येथे दुपारी १वाजेच्या सुमारास हिवरा प्रकल्पाच्या भिंती लगत जवळपास सुमारे ६८ मेंढ्या या अचानक मुत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. सदर घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला असून पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.
-आर.पी.शिरसाठ, तलाठी खडकदेवळा खुर्द.
खडकदेवळा खुर्द येथील मेंढ्यांचा मृत्यू वाढत्या तापमानामुळे झाला असावा, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. मृत सर्व मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून काही मेंढ्यांचे अवयव हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. सदर तपासणी अहवाल आल्यावरच मेढ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.
- डॉ. ए. आर.महाजन, पशु वैद्यकीय अधिकारी

Web Title: 68 sheep deaths in Khandekevla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.