भडगाव येथे ७ कोरोना पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 08:55 PM2020-05-27T20:55:07+5:302020-05-27T20:55:11+5:30
वडजी येथे १ पॉझीटीव्ह रुग्ण आढळला.
.
भडगाव वार्ताहर — भडगाव तालुक्यातील कोरोना संशयीत १८० व्यक्तींचे स्वॅब घेउन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दि.२५ रात्री उशीरापर्यंत १८० पैकी १२० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मात्र ४१ संशयीतांच्या तपासणी केलेल्यापैकी ८ व्यक्तींचे तपासणी अहवालात दि. २७ रोजी पॉझीटीव्ह आढळले आहेत. भङगाव तालुक्यातील वडजी येथेही कोरोना पॉझीटीव्ह आढळला असुन कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यात भङगाव तालुक्यातील वङजी १ पॉझीटीव्ह रुग्ण तर भडगाव शहरात नवीन ७ रुग्ण पॉझीटीव्ह आज आलेल्या तपासणी अहवालात आढळले आहेत. तर ३४ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. मंगल कार्यालयातील कॉरंटाईन नागरीकांना घरी सोङण्यात आले आहे. भडगाव तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण संख्या ५५ झाली आहे. तर भडगाव येथील ३ व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह मयत झाले आहेत. भडगाव शहरात नवीन आढळुन आलेले पॉझीटीव्ह रुग्ण ३ कासारगल्ली, २ शनिचौक. २ सुतारगल्ली या भागातील आहेत. तसेच भडगाव तालुक्यातील वडजी येथेही १ पॉझीटीव्ह रुग्ण आढळला आहे. प्रशासनाची उपाय योजना सुरु आहे. अशी माहीती भङगाव आरोग्य अधिकारी ङॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. प्रशासनाने या भागांमध्ये याआधीच गल्या सील केलेल्या आहेत. १८ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण भडगाव येथील शासकीय आय टी आय मधील कोव्हीड केयर सेंटरला उपचार घेत आहेत. शहरातील तिनही मंगल कार्यालयांमध्ये काही संशयीत नागरीक कॉरंटाईन आहेत. कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या संशयीत नागरीकांना सायंकाळ पर्यंत स्वॅब घेण्याचे आरोग्य विभागाचे काम सुरु होते. यानंतर या नागरीकांना मंगल कार्यालयांमध्ये कॉरंटाईन करणार असल्याची माहीती आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांनी दिली.