वाळु चोरी प्रकरणी वर्षभरात ७० गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:16 AM2021-05-20T04:16:52+5:302021-05-20T04:16:52+5:30

८ गटांच्या लिलावातून मिळाला १० कोटींचा महसुल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वर्षभरात वाळु चोरी प्रकरणी जिल्हा प्रशासनाने ७० ...

70 cases of sand theft registered during the year | वाळु चोरी प्रकरणी वर्षभरात ७० गुन्हे दाखल

वाळु चोरी प्रकरणी वर्षभरात ७० गुन्हे दाखल

Next

८ गटांच्या लिलावातून मिळाला १० कोटींचा महसुल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वर्षभरात वाळु चोरी प्रकरणी जिल्हा प्रशासनाने ७० गुन्हे दाखल केले आहेत. एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ अखेर ही कारवाई करण्यात आली. वाळु चोरी रोखतानाच यंदा जिल्हा प्रशासनाला वाळुच्या उत्खननातून दहा कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. मार्च २०१९ ते २०२० या वर्षात वाळुच्या गटांचे लिलावच झाले नव्हते. त्यामुळे शासनाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडाला होता. काही ठिकाणी जप्त केलेल्या वाळुच्या लिलावातूनच शासनाला महसुल मिळत होता. यंदा जळगाव जिल्ह्यातील २१ पैकी ८ वाळु गटांचे लिलाव झाले. त्यातून शासनाला १० कोटींपेक्षा जास्त रकमेचा महसुल मिळाला आहे. कोरोनाच्या आधीच्या काळात वाळूचे लिलावच झाले नव्हते. मात्र कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर जो वेळ मिळाला त्या वेळेत हे लिलाव झाले.

हरित लवादाच्या मंजुरीनंतर जिल्ह्यातील २१ वाळु गटांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. त्यातून हा महसुल मिळाला आहे.

Web Title: 70 cases of sand theft registered during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.