७० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:09+5:302021-07-29T04:18:09+5:30
जळगाव : एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७१ टक्के रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे ८५ पैकी ६१ ...
जळगाव : एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७१ टक्के रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे ८५ पैकी ६१ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत. उर्वरित २४ रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात बुधवारी ७ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, ६ जण बरे झाले आहेत.
जळगाव शहरात २ रुग्ण आढळून आले, तर २ रुग्ण बरेही झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १५ वर कायम आहे. यासह जळगाव तालुक्यात पुन्हा कोरोनाने धडक दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणची सक्रिय रुग्णांची संख्या ही २ वर स्थिर होती. दरम्यान, बुधवारी अमळनेर, भुसावळ, चाळीसगावात रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी १९६१ आरटीपीसीआरच्या अहवालात ३, अँटिजन चाचणीत ४ बाधित आढळून आले आहेत.