ऑक्सिजन ५८ असतानाही सत्तरवर्षीय आजीने कोरोनाला हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:38+5:302021-06-10T04:12:38+5:30
सुशीलाबाई पंडित पवार (७०, सुभाष चौक, जुना पारधीवाडा, अमळनेर) यांना २६ मे रोजी श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने सुशीलाबाई ...
सुशीलाबाई पंडित पवार (७०, सुभाष चौक, जुना पारधीवाडा, अमळनेर) यांना २६ मे रोजी श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने सुशीलाबाई यांचा मुलगा संजय पवार व बालीक पवार यांनी अमळनेरमधील श्रीदत्त हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉ. किरण बडगुजर यांनी तपासणी केली असता ऑक्सिजन पातळी ५८ होती. त्यामुळे तत्काळ सिटी स्कॅन करण्यात आले. त्यात स्कोअर ही १८ आल्याने पवार कुटुंबाची चिंता वाढली होती. परंतु, डॉ. किरण बडगुजर यांनी पवार कुटुंबाला धीर देत आजीबाईना ऑक्सिजन लावून औषधोपचारासह शर्थीचे प्रयत्न केले. सुशीलाबाईदेखील कोरोनाची भीती न बाळगता औषधोपचाराला प्रतिसाद देत होत्या. हळूहळू ऑक्सिजन पातळी वाढत गेली.
नवव्या दिवशी ४ जून रोजी आजीने कोरोनाला पूर्णपणे हरवले. आजी सुशीलाबाई यांची ऑक्सिजन पातळी ९८ पर्यंत येऊन आजीबाई बऱ्या झाल्याने त्यांना सायंकाळी डॉ. किरण बडगुजर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आजी सुशीलाबाई पवार यांना टाळ्या वाजवत शुभेच्छा दिल्या. यावेळी पवार कुटुंबासोबत लोकसंघर्ष मोर्चा तथा आदिवासी पारधी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे हजर होते. पवार कुटुंबाने डॉ. किरण बडगुजर यांच्यासह आजीबाईंची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
===Photopath===
090621\09jal_5_09062021_12.jpg
===Caption===
ऑक्सिजन ५८ असतानाही सत्तर वर्षीय आजीने कोरोनाला हरवले