फैजपुरात घरकुल मिळण्यासाठी ७०० नागरिकांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:27 PM2018-11-20T18:27:23+5:302018-11-20T18:29:37+5:30

ज्यांना घर नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणाऱ्या लाभधारकांनी योग्य कागदपत्र सादर करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेंतर्गत ७०० नागरिकांनी फार्म सादर केले आहे.

 700 citizens' application for getting home cows in Faizpur | फैजपुरात घरकुल मिळण्यासाठी ७०० नागरिकांचे अर्ज

फैजपुरात घरकुल मिळण्यासाठी ७०० नागरिकांचे अर्ज

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेचे फार्म भरण्यासाठी व्यवस्थाघरकूल आवास योजनेचा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

फैजपूर, जि.जळगाव : ज्यांना घर नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणाऱ्या लाभधारकांनी योग्य कागदपत्र सादर करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेंतर्गत ७०० नागरिकांनी फार्म सादर केले आहे. आणखी नागरिकांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
फैजपूर शहरात मजूर, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांना भरणा आहे. केंद्र्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना या योजनेतंर्गत हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना राबविण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.
‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेचे फार्म भरण्यासाठी मंगळवारी नगराध्यक्षा महानंदा होले यांच्याहस्ते लाभार्र्थींना फार्म वितरण करून तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले. पालिका सभागृह, महात्मा गांधी बहुउद्देशीय हॉल व तडवी समाज बहुउद्देशीय हॉल अशा तीन ठिकाणी हे कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांना फार्मचे वितरण करण्यात आले होते.
सर्व्हे व फार्म स्वीकारण्याचा ठेका देण्यात आलेले टीममधील प्रतिनिधी हे आवश्यक कागदपत्रांसह हे फार्म स्वीकारण्याचे काम पालिका कार्यालयात दोन प्रतिनिधींची नियुक्ती करून करण्यात येत आहे. याठिकाणी प्रभारी नगराध्यक्ष कलीम खॉ मन्यार, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, नगरसेवक देवेंद्र साळी यांनी आढावा घेतला.


 

Web Title:  700 citizens' application for getting home cows in Faizpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.