व्यसनमुक्ती अभियानात ७०० जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:05+5:302021-09-27T04:19:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी व निलॉन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्राण येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी व निलॉन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्राण येथे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले. या अभियानात कर्करोग तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक व राजमोहंमद सिकलगर यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागात तंबाखू, गुटखा याची सवय अधिक असते व त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण या भागात जास्त आहे. अशा ग्रामीण भागात जनजागृती व्हावी या हेतूने रोटरी गोल्डसिटीने हे अभियान आयोजित केल्याचे अध्यक्ष उमंग मेहता यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पासाठी रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ. नीरज अग्रवाल, प्रकल्प प्रमुख राहुल कोठारी, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, पंकज काबरा, कंपनीचे संचालक दीपक संघवी, व्यवस्थापक चिराग देवधर, राजेश घोरपडे, संजय खंबायत, त्रिपाठी, मोरे यांनी सहकार्य केले.