गणेशोत्सव काळात वाढले ७ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:21 PM2020-09-03T12:21:23+5:302020-09-03T12:21:23+5:30

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत जात असून, २८ हजाराच्या घरात पोहचली आहे. गणेशोत्सव काळात जिल्हाभरात एकूण ७ ...

7,000 patients increased during Ganeshotsav | गणेशोत्सव काळात वाढले ७ हजार रुग्ण

गणेशोत्सव काळात वाढले ७ हजार रुग्ण

Next

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत जात असून, २८ हजाराच्या घरात पोहचली आहे. गणेशोत्सव काळात जिल्हाभरात एकूण ७ हजार ३५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट जळगावकरांवर अधिकच गडद होत जात आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात केवळ एकच कोरोनाचा रुग्ण होता. मात्र, आॅगस्टअखेरपर्यंत ही संख्या २७ हजाराच्या पार गेल्याने जिल्हा प्रशासनासमोर चिंतेच्या ढगांनी गर्दी केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता पाचपटीने वाढू लागला आहे. शासनाकडून प्रत्येक महिन्यात लॉकडाऊनमध्ये बदल करून, अनलॉकची प्रक्रिया सुरु केली जात आहे. प्रत्येक महिन्यात विविध अस्थापना व मार्केट सुरु करण्यास परवानगी दिली जात असताना, दुसरीकडे त्याच वेगाने कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८३० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अजूनही नागरिक कोरोनाच्या काळात आखून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांकडूनच हरताळ फासला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
‘भय’ अजून संपलेले नाही
जिल्ह्यात आतापर्यंत ८३० हून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे रुग्णांची संख्या ही वाढतच आहे.

नियमांना हरताळ
प्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पलन करण्याचे आवाहन केले जात होते. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणपती आगमन व विसर्जनादरम्यान नियमांचे पालन करण्यात आले नाही. जिल्ह्यात पाचव्या, सातव्या व अकराव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येते. मात्र, याकाळात अनेक ठिकाणी गणेशभक्तांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा नियमांकडे दुर्लक्ष केले.

गणेशोत्सव काळातील आकडेवारी
-२२आॅगस्ट - ६१६
-२३ आॅगस्ट - ६०५
-२४ आॅगस्ट - ६०५
-२५ आॅगस्ट - ६०४
-२६ आॅगस्ट -८५८
-२७आॅगस्ट - ७०८
-२८ आॅगस्ट - ७८०
-२९ आॅगस्ट - ५६६
-३० आॅगस्ट - ६९६
-३१ आॅगस्ट - ४५६
-१ सप्टेंबर - ५४१

Web Title: 7,000 patients increased during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.