जळगावात ठेकेदाराच्या बंद घरातून ७४ हजारांचे दागिणे लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 08:22 PM2019-04-15T20:22:22+5:302019-04-15T20:25:43+5:30
खंडवा येथे नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाने रात्री साडे अकरा वाजता घर सोडल्यानंतर लगेच त्यांच्यापाठीमागे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे पाच वाजता आयोध्यानगरात उघडकीस आली. अशोक पुलचंद जैस्वाल यांच्याकडे ही घरफोडी झाली आहे.
जळगाव : खंडवा येथे नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाने रात्री साडे अकरा वाजता घर सोडल्यानंतर लगेच त्यांच्यापाठीमागे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे पाच वाजता आयोध्यानगरात उघडकीस आली. अशोक पुलचंद जैस्वाल यांच्याकडे ही घरफोडी झाली आहे.
अशोक जैस्वाल यांचे काका रमेश वालचंद जैस्वाल यांचे खंडवा तालुक्यातील मुंदी गावात निधन झाले होते. त्यामुळे पत्नी ज्योती व मुलगा दिनेशसह हे रविवारी रात्री साडे अकरा वाजता रेल्वेने खंडव्याकडे जाण्यासाठी निघाले. तेथे पोहचताच सकाळी साडे पाच वाजता शेजारी राहणारे पुरुषोत्तम चव्हाण हे मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना जैस्वाल यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लागलीच जैस्वाल यांना माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर जैस्वाल यांनी दिनेश याला परत घरी पाठविले. सकाळी ९ वाजता दिनेश घरी परतला असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त व कपाटातील दागिने गायब झाले होते.
अंत्यविधी सोडून मुलगा परतला
जैस्वाल हे रोज घरासमोरील पुरूषोत्तम चव्हाण यांच्यासोबत मॉर्निग वॉकला जातात. जैस्वाल गावाले गेले याबाबत चव्हाण यांना माहिती होती. चव्हाण नेहमीप्रमाणे ५ वाजता सकाळी उठले असता त्याना जैस्वाल यांचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तत्काळ याबाबत जैस्वाल यांना फोनवरुन माहिती दिली. तोपर्यत कुटूंब खंडव्याला पोहचले होते. याठिकाणी अशोक व त्यांची पत्नी पुढे रवाना झाले तर त्यांचा मुलगा दिनेश हा पुन्हा परतला. सकाळी जळगावात पोहचल्यावर त्याने घराची पाहणी केली. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत पोलिसात तक्रार दिली.
असा गेला मुद्देमाल चोरीला
चोरट्यांनी २ ग्रॅमची २६ हजाराची सोन्याची साखळी, १५ ग्रॅमची १९हजार ५०० रुपयांची सोन्याची साखळी, १० ग्रॅम १३ हजाराची अंगठी, ७ ग्रॅमच्या ९ हजार १०० रुपयांच्या दोन अंगठ्या, ५ ग्रॅमची ६५०० रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण ७४ हजार १०० रुपयांचे दागिणे लांबविले