७४ वर्षीय आजीचा कोरोनाशी यशस्वी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:15 AM2021-05-17T04:15:10+5:302021-05-17T04:15:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : श्वास घ्यायला त्रास होणे, एचआरसीटी स्कोर १६ ऑक्सिजन पातळीवही ७० वर असलेल्या ७४ वर्षीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : श्वास घ्यायला त्रास होणे, एचआरसीटी स्कोर १६ ऑक्सिजन पातळीवही ७० वर असलेल्या ७४ वर्षीय आजीने वीस दिवसात कोरेानावर मात केली आहे. त्यांना रविवारी इकरा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून डिस्चार्ज देण्र्ात आला. कुटुंबियांनी डॉक्टरा व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
चौघुले प्लॉट भागातील रहिवासी मंजुळाबाई विनायक चौधरी यांचा वीस दिवसांपूर्वी कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वास घेण्र्यास त्रास होत होता. तपासण्या केल्यानंतर त्यांचा एचआरसीटी स्कोर हा १६ वर पोहोचला होता. मात्र, डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर व योग््य उपचारांनी व त्यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी कोरोनावर मात केल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गर्ग यांनी सांगितले. डॉक्टरांच्या पूर्ण प्रयत्नांनी कोरोनावर यशस्वी उपचार इकरा सेटरमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंजुळाबाई यांना उपचारादरम्यान, रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज असताना सामाजािक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या सहकार्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ते उपलब्ध करून दिले.
कुटुंबियांना आनंद
७४ वर्षीय मंजुळाबाई यांनी अशा स्थितीत कोरेानावर मात केल्याने कुटुंबियांनी आंनद व्यक्त करत सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले, शिवाय पुष्पगुच्छही दिले.