७५ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:19 AM2021-05-25T04:19:10+5:302021-05-25T04:19:10+5:30
रावेर : कोरोनाच्या दुसऱ्या जीवघेण्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासत असल्याने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रावेर न्यायालयातील ...
रावेर : कोरोनाच्या दुसऱ्या जीवघेण्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासत असल्याने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रावेर न्यायालयातील न्यायालय कर्मचारी, रावेर वकील संघ, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन, न. पा. कर्मचारी कार्यालयातील ७५ जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील मराठा समाज मंगल कार्यालयात सोमवारी रावेर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश आर. एल. राठोड, फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग, साहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोहर जाधव, फौजदार मनोज वाघमारे यांच्यासह पोलीस व महसूल कर्मचारी, पंचायत समिती व जि. प. कर्मचारी, भूमी अभिलेख कर्मचारी, न. पा. कर्मचारी तथा न्यायालयीन कर्मचारी व वकील संघातील ७५ जणांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रेडक्रॉस रक्तपेढीद्वारे रक्त संकलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. जगदीश महाजन, सचिव ॲड. ई. पाटील, निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार, निवडणूक नायब तहसीलदार कविता देशमुख, विस्तार अधिकारी डी. एच. सोनवणे, संदानशिव आदी उपस्थित होते.