२३ गावातील ७५८ हेक्टरातील केळी उद्‌ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:21+5:302021-05-29T04:14:21+5:30

दरम्यान, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपद्ग्रस्त भागाची पाहणी करून तौक्ते ...

758 hectares of bananas destroyed in 23 villages | २३ गावातील ७५८ हेक्टरातील केळी उद्‌ध्वस्त

२३ गावातील ७५८ हेक्टरातील केळी उद्‌ध्वस्त

Next

दरम्यान, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपद्ग्रस्त भागाची पाहणी करून तौक्ते व यास वादळाच्या पार्श्वभूमीवर आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुषंगाने विशेष आर्थिक तरतूद करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वस्त केले.

घोंघावत आलेल्या वादळासोबत ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त होऊन कोट्यवधींची अपरिमित हानी झाली. तर शेकडो घरांवरील टीनपत्रे उडून बेपत्ता झाल्याने तथा वीजखांब वा झाडे तथा झाडाच्या फांद्या पडून घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. त्या अनुषंगाने तलाठी व कृषी साहाय्यकांनी प्राथमिक आढावा घेऊन सादर केला असता, बाधित २३ गावातील ९४९ शेतकऱ्यांचे ७५८ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त झाल्याने ३० कोटी ३० लाख ४० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी. भामरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी एम.जी.भामरे, भाजप उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चाचे संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पं.स. सदस्य जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, प्रल्हाद पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे यांच्यासमवेत आपद्ग्रस्त केळी बागांची पाहणी केली.

तौक्ते वा यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोकणातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुषंगाने नुकसान भरपाई अदा करावी व विमा कंपन्यांनी जिओ टॅगिंगची क्लिष्टता बाजूला ठेवून शासकीय पंचनामे गृहीत धरून संरक्षित विम्याची रक्कम तातडीने अदा करावी यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून पाठपुरावा करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

२४ तासांत २५ गावांचा वीजपुरवठा सुरळीत

तापीकाठच्या ऐनपूर व खिर्डी तथा खानापूर व मोरगाव वीज उपकेंद्रातील तब्बल २७ गावातील वीजपुरवठा गुरुवारी झालेल्या वादळी पावसात रात्रभर खंडित झाला होता. सकाळी मोरगाव व खानापूर वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या खानापूर, चोरवड, अजनाड, निरूळ, पाडळे, अटवाडे, दोधे, नेहता, मोरगाव, खिरवड या १० गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी सुरळीत झाला, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी दिली. उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्यांचे १०० वीजखांब तुटून, वाकून वा कोलमडून तर चार वीज ट्रान्स्फॉर्मर जमीनदोस्त होऊन महावितरणची अपरिमित हानी झाली आहे. कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कंत्राटी मजूर, ४० वीज कर्मचारी, चार सहाय्यक अभियंता व स्वतः उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे.

Web Title: 758 hectares of bananas destroyed in 23 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.