प्रतिबंधित गुटख्यासह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By विवेक चांदुरकर | Published: February 1, 2024 05:34 PM2024-02-01T17:34:03+5:302024-02-01T17:35:29+5:30

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाते.

76 lakh worth of goods seized including banned Gutkha | प्रतिबंधित गुटख्यासह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिबंधित गुटख्यासह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव जामोद : तालुक्यातील आसलगाव येथे प्रतिबंधित गुटख्यासह ७६ लाख ७३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल ३१ जानेवारी रोजी सायंकाळी जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन आसलगाव येथे तपासणी केली असता उत्तरप्रदेशातील देवरी येथील आरोपी अरमान अली कुतुबुददीन अली (वय ३०) एम एच ०४ केयू ४२५७ क्रमांकाच्या मालवाहू वाहनामध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे आढळला. यावेळी ७६ लाख ७३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी, गुलाबसिंग किर्ता वसावे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध कलम ३२८, १८८, २७२, २७३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सपोनि पि. आर. इंगळे करीत आहेत.

तीन खुटी येथे पोलीस चाैकीची गरज

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाते. बर्हाणपूरवरून जळगाव जामोदला सातपुडा पर्वतरांगामधून असलेल्या मार्गाने गुटख्याची वाहतूक केल्या जाते. त्यामुळे या मार्गावर मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या तीनखुटी येथे पोलिस चाैकी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: 76 lakh worth of goods seized including banned Gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव