जळगाव जिल्ह्यातून एकाच दिवशी ७७८ बॅग रक्तसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:06+5:302021-07-12T04:12:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात रक्तदानासाठी ११ संघटना ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आल्या. ११ शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात रविवारी ७७८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात रक्तदानासाठी ११ संघटना ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आल्या. ११ शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात रविवारी ७७८ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यात राष्ट्रवादीचे नेते स्व.गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ जळगावात घेण्यात आलेल्या शिबिरात तब्बल ५०५ जणांनी रक्तदान केले.
‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिरात रविवारी जळगाव जिल्ह्यात ११ ठिकाणी रक्तदान झाले. त्यात सर्वाधिक रक्तदान राष्ट्रवादीचे नेते स्व. गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात झाले. याठिकाणी सकाळी ७.१५ वाजता पहिल्या रक्तदात्याने रक्तदान केले. हे शिबिर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालले. या शिबिराला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली. सिंधी पंचायतर्फे ८०, जैन मंडळ १३, शिरसोली ग्रा.पं.२६, लमांजन ०८, रोटरी क्लब २७, जनमत प्रतिष्ठान ०७, चोपडा शहर ६२, धरणगाव १५, नगरदेवळा २१, भुसावळ येथे झालेल्या शिबिरात १४ दात्यांनी रक्तदान केले. भरपावसात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवित ‘लोकमत’च्या अभियानाला प्रतिसाद दिला.