७८१ बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करणार : डॉ.दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:50 PM2017-08-19T17:50:23+5:302017-08-19T17:57:12+5:30

जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आगामी काळात सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तत्काळ भरण्यात येतील असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जळगाव येथील कार्यक्रमात दिले.

781 BAMS Adjusting Doctor: Dr. Deepak Sawant | ७८१ बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करणार : डॉ.दीपक सावंत

७८१ बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करणार : डॉ.दीपक सावंत

googlenewsNext
ठळक मुद्देशिरसोलीला प्राथमिक आरोग्य केंद्र तर म्हसावदला उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची घोषणापाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला असता त्याठिकाणी जागेची मोजणी करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.पाळधी येथे भूमिपूजन करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्यात येऊन ते रुग्ण सेवेत येईल.पाळधी आरोग्य केंद्रात सर्व सुविधा राहणार असून ते राज्यातील एकमेव असे मॉडेल आरोग्य केंद्र असेल.

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१९ - आरोग्याच्या बाबतीत जळगाव जिल्हा पूर्णपणे सक्षम करायचा आहे. येथील रिक्त पदे, अथवा सोयी-सुविधांबाबत उपाययोजना करण्यात येऊन येत्या तीन वर्षात जळगाव जिल्ह्यातील आरोग्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. आगामी काळात राज्यातील ७८१ बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी जळगावात केली. 
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनानंतर  दुपारी जळगावात अजिंठा विश्रामगृह येथे डॉ. दीपक सांवत यांनी आरोग्य विषयक आढावा बैठक घेतली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी करण्यात येणाºया कामांची माहिती दिली.  
या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागुराव चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते. 
७८१ बीएएमएस डॉक्टरांना दिलासा
रिक्त जागांचा प्रश्न तसेच बीएएमएस डॉक्टरांचाही प्रश्न गंभीर असल्याने ७८१ अस्थायी बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणादेखील त्यांनी यावेळी केली. 
रिक्त जागा १०० टक्के भरा
रिक्तपदांबाबत बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, रिक्त जागा १०० टक्के भरण्यासाठी जाहिरात काढा व ही पदे तत्काळ भरा. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे भरण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  यामुळे तीन महिन्यात रिक्त जागांचा ‘बॅकलॉग’ भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: 781 BAMS Adjusting Doctor: Dr. Deepak Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.